Manikrao Thakre News : ना विधानसभेत ना परिषदेत, तरी काँग्रेस नेत्याचा कार्यकर्त्यांमध्ये दबदबा...

Maharashtra Monsoon Session Congress News : राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेत आणि वादात राहिलेल्या तेलंगणातील केसीआर यांची सत्ता उलथवून लावली आणि काँग्रेसचे सरकार आणलं.
Manikrao Thackeray
Manikrao Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माणिकराव ठाकरे काँग्रेसचा बडा नेता ते आज घडीला विधानसभेत आहेत ना विधान परिषदेत पण दिल्लीपासून अगदी मुंबईतल्या टिळक भवनापर्यंत माणिकराव ठाकरेंचा प्रचंड दबदबा आहे. माणिकराव यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेर जाऊनही आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवतात.

अशातच ते काही महिन्यांपूर्वी झालेल्या तेलंगणाच्या निवडणुकीत माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांनी आपली छाप पाडली आणि दिल्लीचं मन जिंकलं. तेलंगणाचे प्रभारी झाले अर्थात हाय कमांडणे प्रचंड मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली त्यांनीही ती नेटाने पार पाडली. आणि तेलंगणामध्ये सत्तांतर घडवून आणलं.

राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेत आणि वादात राहिलेल्या तेलंगणातील केसीआर यांची सत्ता उलथवून लावली आणि काँग्रेसचे सरकार आणलं. हे सरकार आणण्यामागे माणिकराव ठाकरे यांची रणनीती ही महत्त्वाची मानली जाते. हेच माणिकराव ठाकरे आज महाराष्ट्राच्या विधानभवनात आले होते.

यावेळी त्यांच्यासोबत फार कुणी नेते नव्हते, म्हणजे माणिकराव ठाकरे आजघडीला पक्षात एकाएकी वाटत असले तरी जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी त्यांना गरडा घातला आणि त्यांच्यासोबत फोटो घेतले. त्यामुळे पुन्हा एकदा माणिकराव ठाकरेंचा काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये नसला तरी कार्यकर्त्यांमध्ये अजूनही दबदबा असल्याचं दिसून आलं.

Manikrao Thackeray
Milind Narwekar News : तुमची मते मिळाल्यानंतर अभिनंदन करा; मिलिंद नार्वेकरांचा मिटकरींना मिश्किल टोला

'सत्तेच्या काळात मोठी जबाबदारी...'

कधीकाळी माणिकराव हे काँग्रेस (Congress) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या काळात पक्ष चांगला वाढला. मात्र, राज्यातील आणि देशातील काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर काँग्रेस मध्ये अनेक बदल घडून आले. या काळात अशोक चव्हाण, सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसारखे अनेक नेते पुढे आले. मात्र माणिकराव ठाकरेंचं नेतृत्व मागे पडत गेलं.

मागील पाच-दहा वर्षांत काँग्रेसची प्रचंड पीछेहाट झाली. या काळात त्याच्यामध्ये पटोले यांच्यासारख्या नेत्यांनी पक्ष वाढीसाठी मोठी ताकद लावली. मात्र या काळामध्ये ठाकरे कुठेही दिसले नाहीत. राज्याच्या राजकरणात ते नसले तरी त्यांची राज्या बाहेर मोठी ताकद होती. अशातच आज ते विधानभवनात दिसल्यामुळे ठाकरे पुन्हा राजकारणात सक्रिय होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Manikrao Thackeray
Shivsena and Vaijapur Vidhan Sabha : लोकसभेला भुमरेंना मताधिक्य, तरीही शिवसेनेसाठी सोपी नसणार वैजापूर विधानसभेची निवडणूक!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com