Uddhav Thackeray-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT : शिवसेना 'त्या' मुद्यावर मुख्यमंत्री फडणवीसांना पाठिंबा देणार; ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Sanjay Raut statement : आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने भेटलो, असे तुम्हाला कोणी सांगितले. हे सर्व तुम्हीच ठरवता. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात प्रदीर्घ म्हणजे दीड तासापेक्षा जास्त वेळ भेट झाली.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 21 January : छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील जे गड किल्ले आहेत, त्यावरील अतिक्रमणं हटविली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. राज्याचे मुख्यमंत्री या कामात लक्ष घालणार असतील तर शिवसेना नक्कीच या कामात मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देईल, असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक फेब्रुवारी ते ३१ मेपर्यंत ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या निर्णयाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वागत करून त्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरील अतिक्रमणं काढून त्यांना वैभव प्राप्त होणार असेल तर ते मोठे काम आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा असेल.

शरद पवार यांच्या भेटीवर बोलताना संजय राऊत यांनी पत्रकारांना उलट प्रश्न केले. ते म्हणाले, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने भेटलो, असे तुम्हाला कोणी सांगितले. हे सर्व तुम्हीच ठरवता. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात प्रदीर्घ म्हणजे दीड तासापेक्षा जास्त वेळ भेट झाली. त्या बैठकीला आमदार जयंतराव पाटीलही उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन नेत्यांमध्ये यावर कोणतीही चर्चा झाली नव्हती. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यासंदर्भात अनेक बातम्या आल्या होत्या. त्यासंदर्भात आघाडीतील दोन प्रमुख नेत्यांनी चर्चा केली, संजय राऊत यांनी सांगितली.

ईव्हीएमच्या विरोधात जी जी आंदोलने होणार आहेत, त्या सर्व आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहोत, त्यामुळे आमदार उत्तम जानकर यांच्या २३ तारखेला होणाऱ्या जंतरमंतरवरील आंदोलनाला आम्ही जाणार आहोत, असेही खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT