Uddhav Thackeray|
Uddhav Thackeray| 
मुंबई

ठरलं तर! शिवसेना एनडीएच्या उमेदवारालाच मतदान करणार ! राऊतांनी दिले संकेत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (११ जुलै) शिवसेना (Shivsena) खासदारांच्या बैठकीत खासदारांच्या मागणीला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून लवकरच अधिकृत माहीती जाहीर केली जाणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे आता शिवसेनेत खासदार संजय राऊत यांच्या शब्दाला पूर्वीसारखे अतिमहत्व उरले नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत शिवसेना द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचं भाष्य केलं होते. “ शिवसेनाप्रमुख बाळासाहेबही अशा विषयांवर नेत्यांची बैठक होत असत. तेव्हाही सहकाऱ्यांची मते जाणून घेऊन निर्णय घेतले जायचे. यावेळीही उद्धव ठाकरेंनी कालच्या बैठकीत खासदारांशी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीबाबत चर्चा केली. द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली. द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला म्हणजे तो भाजपाला पाठिंबा होत नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

तसेच, विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यासोबतही आमच्या सद्भावना आहेत. यापूर्वीही शिवसेनेने प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी आम्ही एनडीएच्या उमेदवाराला नाही तर प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला होता”, असंही संजय राऊत यांनी सांगितले. “उद्धव ठाकरे दोन दिवसात याबाबत भूमिका स्पष्ट करतील. उद्धव ठाकरे कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाहीत. त्यांचा निर्णय आमदार-खासदारांना बंधनकारक असेल”, असेही राऊतांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT