मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे गटाला समर्थन देणारे जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख व अन्य पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी केली जात आहे. आता पक्षाने ठाकरे यांचे निकवर्तीय मानले जाणार माजी आमदार व पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. (Shiv Sena Latest Marathi News)
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून या कारवाईची घोषणा करण्यात आली आहे. फाटक यांच्यासोबत पालघरचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांची सोमवारीच हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच आमदार तानाजी सावंत यांनाही सोलापूरच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हटवण्यात आलं आहे.
कोकणातील आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांना पक्षातून निलंबित कऱण्यात आले आहे. तसेच ठाण्यासह कोकणातील काही पदाधिकाऱ्यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधात कारवाया केल्याचा ठपका सर्वांवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात आणखी पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिंदे हे बंड करून सुरतला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांच्यावर मनधरणीची जबाबदारी सोपवली होती. सूरतमध्ये गेल्यानंतर मात्र फाटक थेट शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसला. फाटक हे ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जातात. तसेच ठाण्यातील बड्या नेत्यांपैकी ते एक आहेत.
मीच जिल्हाप्रमुख : संतोष बांगर
जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर बांगर यांनी मात्र आपणच जिल्हाप्रमुख असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. मला कोणीही हटवू शकत नाही, असं ते म्हणाले. बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार आणि जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. पण त्यांच्या बंडखोरीनंतर आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावून हटवण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.