Shivsena Candidate List for Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण 45 जणांची नावे घोषित करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांचेही नाव या यादीत असून ते कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामधून ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 60 जणांची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते अशी चर्चा होती, परंतु 45 जणांची पहिली यादी जाहीर केली गेली. यामध्ये एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पुन्हा संधी दिल्याचे दिसून आले आहे.
शिवसेनेच्या पहिल्या यादीत समाविष्ट असणाऱ्या शिवसेनेच्या दिग्गजांमध्ये गुलाबराव पाटील - जळगाव ग्रामीण, संजय शिरसाट - (छत्रपती संभाजीनगर-पश्चिम), उदय सामंत - (रत्नागिरी), किरण सामंत - (राजापुर), दीपक केसरकर - (सावंतवाडी), यामिनी जाधव -(भायखाळा), शहाजीबापू पाटील - (सांगोला), तानाजी सावंत - (परांडा), शंभुराज देसाई -(पाटण), प्रदीप जैस्वाल - (छत्रपती संभाजीनगर - मध्य), सदा सरवणकर - (माहिम) आदी नेत्यांचा समावेश आहे.
याशिवाय संदीपान भुमरे(Sandipan Bhumre) हे छत्रपती संभाजनगर लोकसभा मतदारसंघातून विजयी होवून, लोकसभेत गेल्याने, त्यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. तर, सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी खरंतर भाजपच्या इच्छुकांकडूनही मतदारसंघावर दावा सांगितला जात होता. मात्र आता हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला असल्याने, या ठिकाणी सत्तारांना नाराजांची मनधरणी करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
'जय महाराष्ट्र.. हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.' असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.