MNS News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली उमेदवारांची यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक संभाव्य याद्या लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी लढत होत असताना आता राज ठाकरेंनीही मैदानात उडी घेतली आहे.आता मनसेची दुसरी यादी जाहीर केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना दादर माहिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.तर वरळीमधून संदीप देशपांडे यांना तर पुण्यात हडपसरमधून साईनाथ बाबर, कोथरुडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा विधानसभा निवडणुकीत 220 ते 240 जागा लढणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी काही दिवसांपासून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करुन ते उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. आता राज ठाकरेंनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची (MNS) 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे वरळीत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.तसेच
मनसेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. सोमवारी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी (ता.22) रात्री उशिरा मनसेनं ट्विट करत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार न देता थेट महायुतीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला होता.एवढंच नाही तर महायुतीच्या नारायण राणे, श्रीकांत शिंदे,मुरलीधर मोहोळ,संदिपान भुमरे यांच्यासाठी जाहीर सभाही घेतल्या होत्या. यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसे-महायुती एकत्र लढणार असल्याची चर्चाही होती.
पण अशातच आता विधानसभा निवडणुकीला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'एकला चलो' ची भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनीन आता मोठी घोषणा घेतली असून 'माघार नाही तर टक्कर' देण्याची तयारी सुरू केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.