जुई जाधव
Mumbai News : देशातील सर्वात मोठा सागरी मार्गाचं उदघाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र स्थानिक आमदार आणि खासदारांचं नाव निमंत्रण यादीत नसल्याने त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे यावरून आता नाराजी नाट्य सुरु झालं आहे.
देशातील सर्वात मोठा सागरी सेतू शिवडी- न्हावा शेवाचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी मंत्रिमंडळातील सगळेच नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र हा मार्ग ज्या भागातून जात आहे, त्या भागातील स्थानिक आमदार अजय चौधरी आणि खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांना आमंत्रण नसल्याने त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. ऐनवेळी आमंत्रण आल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. (Shivadi Nhava Sheva Sea Link)
उद्घाटन आमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार आणि खासदारांना आमंत्रण नसल्याने नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. प्रोटोकोल नुसार स्थानिक आमदार आणि खासदारांना आमंत्रण देणं अनिवार्य असतं, मात्र आज तसं काहीच झालं नाही. आमंत्रण घेऊन एक व्यक्ती आज सकाळी अरविंद सावंत यांच्या घरी गेला आणि तुमचा पत्ता उशिराने सापडल्यामुळे आमंत्रण उशिरा देत आहोत असं त्या व्यक्तीने सांगितलं. त्यामुळे खासदार आणि आमदारांकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
टोल माफ करा
शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूवर 250 रुपये टोल लागू करण्यात आला आहे. हा टोल देखील खूप जास्त आहे. हा सेतू टोल फ्री असावा अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केला आहे. त्यामुळे यावरून देखील वाद सुरु झाला आहे. महाविकास आघाडी नेत्यांचं म्हणणं आहे की हा मार्ग टोल फ्री असावा. तर दुसरीकडे महायुतीकडून हा टोल सर्वात कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
वाहनांसाठी वेगमर्यादा...
आज पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, संभाव्य धोके, अडथळे आणि गैरसोय कमी करण्यासाठी, मुंबई पोलिसांनी भारतातील सर्वात लांब सागरी पुलावर वेग मर्यादा लागू केल्या आहेत. शिवडी- न्हावा शेवा वर कार, टॅक्सी, हलकी मोटार वाहने, मिनीबस आणि टू-एक्सल बससह चारचाकी वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा 100 किमी प्रतितास असेल. सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी पूल चढताना आणि उतरताना वेगासाठी ताशी 40 किमी असे निर्बंध असणार आहे.
याव्यतिरिक्त, मोटारसायकल, मोपेड, तीनचाकी वाहने, ऑटो, ट्रॅक्टर, बैलगाडी किंवा घोडागाडी सारख्या कमी वेगवान वाहनांना शिवडी न्हावा-शेवा वर प्रवेश करण्यास मनाई आहे. तसेच, अवजड वाहने, ट्रक आणि मुंबईच्या दिशेने जाणार्या बसेसना ईस्टर्न फ्रीवे वापरण्यास मनाई आहे. त्याऐवजी, त्यांना मुंबई पोर्ट-शिवडी एक्झिट (एक्झिट 1C) साठी आणि पुढील प्रवासासाठी ‘गडी अड्डा’ जवळील MBPT रोडचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.