Nagar: नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक लंके कुटुंबातील एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय सुरू असून, योग्य वेळी योग्य निर्णय समोर येईल, असे आमदार नीलेश लंके यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी सांगून राजकीय उत्सुकता वाढवली. राणी लंके यांच्या या विधानाने नेमके वरिष्ठ कोण? महायुती की महाविकास आघाडी?, या चर्चेला आता उधाण आले आहे.
नगर दक्षिण लोकसभेची जागा महायुतीत भाजपकडे आहे आणि या जागेवर महायुतीतील अजित पवार गटात असलेले आमदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी दावा केल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. राणी लंके यांनी पाथर्डी येथे केलेल्या या घोषणेवर भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्वयंघोषीत उमेदवारी जाहीर करणाऱ्यांना कोण काय सांगणार, असे म्हणून महायुतीचा धर्म पाळला जाईल, असे म्हटले होते. मंत्री विखे यांची प्रतिक्रिया म्हणजे, उमेदवारीचा निर्णय महायुतीत वरिष्ठांकडे होईल, असा होता. यातच राणी लंके यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढणारच असल्याचे म्हटल्याने महायुतीतील विखे आणि लंके यांच्यात नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवरून रणकंदन सुरू झाल्याचे दिसते आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राणी लंके यांची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. ही यात्रा पाथर्डी येथून सुरू झाली. कर्जत-जामखेड येथून ही यात्रा श्रीगोंदा तालुक्यात पोहोचली होती. यावेळी आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन, शरद नवले, नगरसेवक सतीश मखरे, कारभारी बोरुडे, मनिषा खामकर, प्रतिभा गांधी उपस्थित होते. राणी लंके यांनी यावेळी केलेल्या भाषणातून लोकसभा निवडणुकीबाबत जोरदार राजकीय फटकेबाजी केली. याशिवाय निवडणुकीच्या रिंगणात असणारच असेही देखील ठामपणे सांगितले.
राणी लंके म्हणाल्या, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहचविण्याचा या यात्रेचा मानस आहे. या यात्रेस पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी येथून सुरुवात झाली. कर्जत, जामखेड तालुक्यात यात्रेचे जोरदार स्वागत झाले. या यात्रेची सांगता नगर तालुक्यात होईल". लोकसभेच्या निवडणुकीत लंके कुटुंबातून कोणीतरी एक जण रिंगणात असणार आहे, असेही राणी लंके यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी समोर कोण उमेदवार आहे, याचा विचार करणार नाही. समोरून कोणताही उमेदवार असू देत, याची चिंता न करता सर्वसामान्य लोकांच्या पाठबळावर या निवडणुकीला लंके कुटुंब समोरे जाणार असेही राणी लंके यांनी यावेळी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.