baba siddique | shivkumar gautam sarkarnama
मुंबई

Baba Siddique: उत्तर प्रदेशातील एक प्रथा अन् शूटर शिवकुमावरची झाली सिद्दीकींच्या हत्येसाठी निवड

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळ्या शिवकुमार गौतमने झाडल्याचं सांगण्यात येत आहे.

Akshay Sabale

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी नव-नवीन धागेदोरे हाती येत आहेत. आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी शिवकुमार गौतम याची निवड कशी झाली? याची माहिती समोर आली आहे. तसेच, कटातील आरोपी स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम व्हिडिओच्या माध्यमातून संपर्कात असायचे, असं तपासात समोर आलं आहे.

शिवकुमार गौतम हा उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे. उत्तर प्रदेशात लग्नाच्या वरातीत गोळीबार करण्याची प्रथा आहे. शिवकुमारनं काही वेळेस गावातील वरातींमध्ये हवेत गोळीबार केला होता. त्याच सरावाच्या आधारावर सिद्दीकी यांच्या हत्येसाठी शिवकुमार याची निवड झाली होती.

तीन तास घटनास्थनाळावर

घटनेच्या दिवशी शिवकुमार गौतम, गुरूमेल सिंह आणि धर्मराज कश्यप हे सायंकाळी सहा वाजल्यापासून घटनास्थळी होते. तेथे नाष्टe करून ते झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर पोहोचले. रात्री 9.30 वाजता बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. शिवकुमारनं सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्याचं तपासात समोर आलं आहे.

चौथ्या आरोपीला अटक

सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेनं पुण्यातील भंगारवाला हरिशकुमार बालकराम निसाद याला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. हरिशने शुभम आणि प्रवीण या लोणकर बंधुंकडून पैसे घेऊन शूटर्सना पुरविले, तसेच कुर्ला येथे भाड्यानं घर घेण्यासाठी मदत केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT