Baba Siddique : “काम होने दो, फिर...”, सिद्दीकींच्या हत्येसाठी शूटर्सना दिलेला मोठा शब्द

Baba Siddique News Updated : सिद्दीकी यांच्यावर तीन जणांनी 6 गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील 4 गोळ्या लागल्यानं सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर रोज नव-नवीन माहिती समोर येत आहे.
Baba Siddique murder accused
Baba Siddique murder accused sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात रचल्याचं समोर आलं आहे. सिद्दीकी यांच्या ठराविक रक्कम न देता, काम झाल्यानंतर मोठी रक्कम देणार असल्याचं बोललं गेलं. त्यानुसार, बाबा सिद्दीकी यांचा फोटो आणि फ्लेक्सही देण्यात आला होता.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेनं गुरूमेल सिंह आणि धर्मराज कश्यप, अशा दोघांना अटक केली आहे. दोघांच्या चौकशीत त्यांना ठराविक रक्कम न ठरवता थेट, ‘काम होने दो, बडी अमाउंट मिलेगी,’ असं सांगितल्याचं समोर आलं आहे.

लोणकर बंधूंनी पुरवले पैसे...

बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात शूटर्सना लोणकर बंधूंनी पैसा पुरवल्याचे आणि लॉजिस्टिक सपोर्ट दिल्याचं आतापर्यंतच्या गुन्हे शाखेच्या तपासातून निष्पन्न झालं आहे. शुभम लोणकर यानेच शस्त्र पुरवल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. प्रवीण लोणकरच्या पुण्यातील डेअरीत बसून सिद्दीकी यांच्या हत्येबाबात बैठक झाल्याचंही तपासातून स्पष्ट झालं.

Baba Siddique murder accused
Baba Siddique : खोलीसाठी दुप्पट भाडे, इंग्लिशमध्ये बोलायचे अन्...; सिद्दीकींचे हत्यारे असल्याचं कळताच कुर्ल्यातील चाळीत खळबळ

लोणकर बंधूंनी कटात सामील करून घेतलं..

प्रवीण लोणकरनं हा पुण्यात दूध डेअरीजवळ भंगाराच्या दुकानात काम करणारा शिवकुमार गौतम, धर्मराज कश्यप यांच्याशी ओळख करून घेतली. त्यानंतर प्रवीण आणि शुभमने त्यांना कटात सामील करून घेतले. डेअरीमध्ये त्यांच्या बैठकाही झाल्या. आरोपींच्या चौकशीतूनच लोणकर बंधूंचे नाव पुढे आले आहे.

Baba Siddique murder accused
Baba Siddique Shot Dead : शार्प शूटर धर्मराजच्या वकिलाचा डाव फसला; मुंबई न्यायालयाकडून गंभीर दखल

शुभम लोणकरच्या पोस्टची पडताळणी...

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणार शुभम लोणकर हा बंदूक तस्करीत सहभागी असल्याचं अकोला पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर ‘शुभू’ नावाच्या अकाउंटवरून एक पोस्ट व्हायरल करीत हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली. या पोस्टची मुंबई आणि अकोला पोलिसांकडून पडताळणी करण्यात आल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com