Wasai Shivsena
Wasai Shivsena Virar Reporter
मुंबई

विरारमध्ये सेनेला धक्का; शिवसैनिकांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश...

सरकारनामा ब्युरो

विरार : एका बाजूला शिवसेनेत काही दिवसांपासून इनकमिंग सुरु असतानाच अचानकपणे आता शिवसेनेतील निष्ठावंत पक्ष सोडून बहुजन विकास आघाडीमध्ये जाऊ लागले आहेत. हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. विरार पश्चिमेकडील शिवसेना शहर समन्वयक वैभव विलास पांडे व सुमारे 35 ते 40 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला.

शिवसेनेत वसई तालुक्यात काही प्रमाणात पक्षप्रवेश होत असताना सतत जुन्या जाणत्या व ज्यांनी खडतर काळापासून शिवसेना जनसामान्यात रुजवली, वाढवली. मतदारांपर्यंत व घराघरात भगवा पोचवून हक्काचा मतदार तयार केला. त्यांनाच सतत डावलले जातं असल्याचा व वेगवेगळ्या पक्षातून स्वार्थासाठी आलेल्यांना मोठमोठी पदे देण्यात येत आहेत, असा आरोप करत शिवसैनिकांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बविआमध्ये प्रवेश केला.

यावेळी बविआचे संघटक सचिव अजीव पाटील, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, माजी सभापती सखाराम महाडिक, माजी नगरसेवक प्रशांत राऊत, नेते विलासबंधू चोरघे, प्रफुल साने, आनंद पाटील, जयेश ठक्कर उपस्थित होते. शिवसेनेतून बविआमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये शिवसेना विरार शहर समन्वयक व माजी शहर प्रमुख वैभव विलास पांडे, ग्लोबल सिटी विभाग प्रमुख दर्शन मोहिते, तिरुपती विभाग प्रमुख हर्षद जानवलकर, डोंगरपाडा विभाग संघटिका रेणुका पांडे, उपविभागप्रमुख पारितोष पाटील, मेहुल वझे, शाखाप्रमुख अक्षय तेली, शत्रुघ्न जयस्वाल, उपशाखाप्रमुख प्रवीण केंद्रे या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

तसेच महिला आघाडी शाखासंघटक अंजली सरवणकर, पूजा जयस्वाल, उपशाखासंघटक माधुरी कौशिक, दुर्वा मोहिते, सोनल शाह, मनीषा शर्मा, युवासेनेचे पदाधिकारी निखिल नाडकर, रोहित हळदणकर, भावेश वाघेला, योगेश लाड, सौरभ राजपूत, तेजस पवार, मित शाह, वेदांत परब, ध्रुव भट शिवसैनिक संजय नरिम, संजय विश्वकर्मा, वैभव खंदारे, दिवाकर विंदा व इतर शिवसैनिक यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT