वसई विरार पालिकेत वाढलेले ११ नगरसेवक 'बविआ'च्या पथ्यावर?

वसई-विरार महापालिका आमदार हितेंद्र ठाकुर आणि बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला समजली जाते.
HItendra Thakur
HItendra Thakur Sarkarnama

वसई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेल्या एक वर्षभरापासून रखडल्या आहेत. मात्र आता या निवडणूका लवकरच होण्याच्या शक्यता आहेत. अशात आता मंत्रिमंडळाने नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्के वाढ जाहीर केल्याने अनेक इच्छुकांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. वसई-विरार महापालिकेमध्येही ही संख्या ११५ वरुन १२६ होणार आहे. सोबतच प्रभाग संख्या ३८ च्या जागी ४२ होणार आहे.

अगोदर ११५ सदस्यांच्या महापालिकेत ३८ प्रभाग होते. त्यात ३७ प्रभाग हे ३ नगरसेवकांचे तर १ प्रभाग हा ४ नगरसेवकांचा होणार होता. परंतु आता पालिकेत १२६ नगरसेवक येणार असल्याने प्रभागांची संख्या ३८ वरून ४२ वर गेली आहे. नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रभागाची हद्द कमी होणार असल्याने त्याचा फायदा होण्या बरोबरच निवडणुकीचा खर्च ही कमी होणार आहे.

HItendra Thakur
वसई-विरार महापालिकेत सत्तेसाठी प्रसाद लाड यांनी ठोकला शड्डू

वसई-विरार महापालिकेत हितेंद्र ठाकुर यांचे वर्चस्व, पण शिवसेनेने केले लक्ष केंद्रीत :

वसई-विरार महापालिका आमदार हितेंद्र ठाकुर आणि बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला समजली जाते. त्यामुळे आतापर्यंत इथे अन्य पक्षांची डाळ शिजू शकली नव्हती. त्यामुळे हे वाढलेले नगरसेवक बविआच्या पथ्यावर पडणार असल्याचे बोलले जात आहे. पण बहुजन विकास आघाडीचे हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेने सध्या 'बविआ'मधील नाराजांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. यातुनच शिवसेनेला पहिल्यांदा युवा नेते पंकज देशमुख यांनी साथ दिली होती.

HItendra Thakur
आमदार हितेंद्र ठाकूर यांना धक्का, खंदे सहकारी शिवसेनेत दाखल!

त्यानंतर आता हितेंद्र ठाकूर यांच्या जवळचे आणि माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधत चौधरी यांनी सेनेत प्रवेश केला आहे. सुदेश चौधरी यांच्यासोबत माजी नगरसेवक किशोर नाना पाटील यांनीही हाती शिवबंधन बांधत 'बविआ' धक्का दिला आहे. या दोघांबरोबरच नगरसेविका पुतुल झा या देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समजते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com