Bhagat Singh Koshyari| Aaditya Thackeray News | Latest Marathi News Updates
Bhagat Singh Koshyari| Aaditya Thackeray News | Latest Marathi News Updates sarkarnama
मुंबई

राज्यपालाचं अर्धवट भाषणं ही लाजीरवाणी गोष्ट, महाराष्ट्राचा अपमान!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाची (Maharashtra budget 2022) सुरवात गोंधळाने झाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणाला सुरवात केली तेव्हा सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी राज्यपालांचा निषेध केला. "शिवाजी महाराज की' अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

राज्यपालांना राष्ट्रगीतासाठी दोन वेळेस माईकवरून आमदारांना विनंती केली. राष्ट्रगीतानंतर त्यांनी अभिभाषणास सुरवात केली. तेव्हा पुन्हा घोषणाबाजी सुरु झाली. कोश्यारी यांनी दोन वाक्य पूर्ण करुन आपले भाषण संपवलं. ते फाईल बंद करुन राजभवनाच्या दिशेला निघून गेले. अवघ्या 22 सेकंदात राज्यपालांनी आपले भाषण आवरत पटलावर ठेवले. त्यामुळे सभागृहातील उपस्थित अचंबित झाले. सत्ताधारी पक्षाने 'राज्यपाल हटाव' अशा घोषणा यावेळी दिल्या.

राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेल्याबाबत माध्यमांशी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले,''राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण ने देता निघून गेले. ही लाजीरवाणी गोष्ट असून हा महाराष्ट्राचा अपमान आहे,'' (Aaditya Thackeray News Updates)

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. ''राज्यपालांना राष्ट्रगीतासाठी दोन-दोन वेळेस माईकवरून आमदारांना विनंती करावी लागते हे दुर्भाग्याचं आहे. ही सत्ताधार्‍यांची, त्यांच्या गटानेत्यांची जबाबदारी होती. पण ते निभावू शकले नाही,'' असा आरोप शेलारांनी केला. भाजपाने महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. बीडचे आमदार संजय दौंड यांनी सभागृह परिसरात शीर्षासन करत राज्यपालांचा निषेध नोंदवला.

यंदाचे अधिवेशन हे ठाकरे सरकारच्या काळातील सर्वाधिक कालावधीचे असे आहे. यंदा ३ मार्च ते २४ मार्च या कालावधीत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे. कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचे ठिकठिकाणी पडसाद उमटताना दिसून येत आहेत. सोलापुरात ४ मार्चला राज्यपालांचा दौरा आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शिवभक्तांनी राज्यपालांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कोश्यारींनी माफी मागावी, अन्यथा त्यांचा दौरा रोखणार असल्याचा इशारा येथील शिवभक्तांनी दिला आहे. (Latest Marathi News Updates)

''विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरेल अशी हूल विरोधी पक्षातर्फे उठवली जाते आहे. आदड आपट करून वादळी अधिवेशन होत नाही

त्यामुळे कसलं वादळ निर्माण करणारे कुठेतरी फुंकर मारता त्यांना वाटत वादळ आले अशी वादळ येत नाही,'' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT