भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) बाजी मारली आहे. शिवसेनेने भाजपच्या (BJP) मदतीने काँग्रेसचा (Congress) पराभव घडवून आणला आहे. शिवसेनेचे नगरसेवक संजय म्हात्रे हे सभापतिपदी निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे आगामी राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
भिवंडी महापालिकेच्या (Bhiwandi Municipal Corporation) स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय म्हात्रे विजयी झाले आहेत. म्हात्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार अरुण राऊत यांचा 14 विरुध्द 2 मतांनी पराभव केला आहे. भिवंडी महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या मागील निवडणुकीत काँग्रेसने म्हात्रे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे म्हात्रे हे बिनविरोध निवडून आले होते. आता त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने रिक्त पदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेना उमेदवारास भाजपच्या 4 विरोधी सदस्यांनी मतदान केल्याने म्हात्रेंचा विजय झाल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या आदेशाला गटनेत्याने केराची टोपली दाखविल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.
स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणुकीत काँग्रेसचे राऊत आणि शिवसेनेचे म्हात्रे यांच्यात लढत झाली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. भाजपच्या 4 सदस्यांनी म्हात्रे यांना मतदान केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दोन्ही बाजूंकडून भाजप नगरसेवकांची मनधरणी केली जात होती. सभापतिपदासाठी मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन झाल्याची चर्चा रंगली होती. शिवसेने भाजपला सोबत घेऊन राज्यातील सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसलाच धक्का दिला आहे.
भिवंडी महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये नगरसेवकांचे संख्याबळ 16 असून त्यामध्ये काँग्रेस 8, शिवसेना 2, कोणार्क विकास आघाडी 2 आणि भाजपची 4 सदस्य संख्या आहे. शिवसेनेचे संजय म्हात्रे यांना काँग्रेसचे काही नगरसेवक तसेच अन्य नगरसेवकांचा पाठिंबा होता. या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक कोणाला पाठिंबा देणार, याकडे लक्ष लागले होते. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.