धक्कादायक : तुरुंगातून सुटण्याची बाबा राम रहीमला आधीच होती माहिती

डेरा सच्चा सौदाचा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) हा तुरुंगातून बाहेर आला आहे.
Gurmeet Ram Rahim
Gurmeet Ram Rahim
Published on
Updated on

चंडीगड : डेरा सच्चा सौदाचा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) हा तुरुंगातून बाहेर आला आहे. हरियानातील भाजप (BJP) सरकारने त्याला 21 दिवसांचा फर्लो रजा मंजूर केली आहे. परंतु, ही रजा मंजूर होण्याची राम रहीम आधीच माहिती असल्याची माहिती असल्याची बाब आता समोर येऊ लागली आहे. कारण मागील महिन्यातच त्याने डेऱ्याला चिठ्ठी लिहून तुरुंगातून बाहेर येत असल्याचे कळवले होते.

राम रहीमच्या सुटकेने आता डेऱ्यातील हालचाली वेगाने घडू लागल्या आहेत. सिरसा येथील डेऱ्यात 25 जानेवारीला एक मोठा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी राम रहीमने चिठ्ठीतून संदेश पाठवला होता. यात त्याने तुरुंगातून पुढील महिन्यात बाहेर येईन, असे म्हटले होते. ही चिठ्ठी त्यावेळी कार्यक्रमात वाचून दाखवण्यात आली होती. यात म्हटले होते की, परमपिता परमात्म्याची इच्छा असेल तर लवकरच तुमचे दर्शन करेन, असेही त्याने म्हटले होते. आता डेऱ्यात 28 फेब्रुवारीला मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी राम रहीमच्या कन्या चरणप्रीत, अमरप्रीत आणि मानसकन्या हनीप्रीत या डेऱ्यात दाखल झाल्या आहेत.

Gurmeet Ram Rahim
सासऱ्याला टाकलं मागे; भाजपच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांचा जावई पाचपट अधिक श्रीमंत

राम रहीमचे पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका (Assembly Election) डोळ्यासमोर ठेवून भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशात या दोन्ही राज्यात राम रहीमचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. त्यामुळे त्याला 21 दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. भाजपने राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढून मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. मागील दशकभरापासून राम रहीम हा तुरुंगात आहे. त्यामुळे तो आता तुरुंगातून बाहेर पडून थेट प्रचारात उडी घेण्याची शक्यता आहे.

Gurmeet Ram Rahim
राजकारण तापलं! सदाभाऊ खोत थेट उतरले गोव्याच्या मैदानात

साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये सुनावली होती. नंतर 2021 मध्ये त्याला 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. डेरा व्यवस्थापक रणजितसिंग यांच्या खून प्रकरणात राम रहीम आणि चौघांना केंद्रीय विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. राम रहीम 13 लाख रुपये तर इतर चौघांना 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रणजितसिंग याचा 2002 मध्ये खून करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com