Uddhav Thackeray, Ashish Shelar sarkarnama
मुंबई

'सावरकर समलैंगिक होते, असं म्हणणाऱ्यांच्या सोबत तुम्ही बसलात ; ठाकरेंवर घणाघात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील काही मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधला. ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलारांनी (Ashish Shelar) पलटवार केला.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (shivsena dasara melava) काल भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील काही मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधला. ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलारांनी (Ashish Shelar) पलटवार केला.

आशिष शेलार म्हणाले, "'सकाळी आरएसएसचा जो कार्यक्रम झाला ती विचारांची श्रीमंती होती आणि संध्याकाळी जे झालं ते उसनवारी होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिशा देण्याचे काम केलं पाहिजे. पण त्यांची दिशा चुकल्याने षण्मुखानंद हॉलमध्ये दशावतार सुरु होता. समोर बसलेले शिट्ट्या मारतात की नाही हे बघत होते. ना विचार, ना धारा, ना धग असा हा शिवसेनेचा दसरा मेळावा. हा मेळावा म्हणजे वातानुकूलित उसनवारी होती, "

''आधीच भीती होती म्हणून चिरकण्याची भाषा त्यांनी केली. संघ राज्य पद्धतीवर नख लावली जातायत. डंख लावला जातोय. जी भाषा तुकडे-तुकडे गॅंगची आहे तीच भाषा उद्धव ठाकरे यांच्या भाषणात होती की काय? असा आजचा त्यांचा सूर होता. देशाच्या एकतेसाठी अखंडतेसाठी आणि हिंदुत्वाच्या अस्तित्वासाठी उपरेपण चालतील. पण हिंदुत्व आणि देशाच्या एकतेच्या विरोधात टपोरी चालणार नाहीत. ज्यांचं हिंदुत्व आणि रंग शालीचा आहे त्यांनी कातडी भगवी असलेल्यांना शिकवू नये. आमची कातडीही भगवी आणि आत्माही भगवा आहे” असे शेलारांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावलं. “धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशीच काल बाबसाहेबांच्या संविधानावर प्रश्न उपस्थित केला. भाजपवर काहीही बोला पण संघ पद्धतीवर नख लावण्याचं काम केलात तर खपवून घेतलं जाणार नाही”, असा इशारा आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला. ''राज्याच्या प्रमुखांनी सुद्धा अशी भाषा वापरावी याचा आम्ही निषेध करतोय,'' असं शेलार यांनी सांगितलं.

''मुंबई महापालिका निवडणुकीत आता सालट काढून दाखवू. सावरकर समलैंगिक होते, असं म्हणणाऱ्यांच्या सोबत तुम्ही बसलात. त्यांची बदनामी करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही घालून पाडून बोलणार नाहीत. महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही ही आमची भूमिका आहे,'' असं आशिष शेलार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT