रामदास कदमांचा मुख्यमंत्र्यांवर 'लेटर बॉम्ब' ; मंत्र्यांविरोधात तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना उद्देशून रामदास कदम (ramdas kadam) यांनी हे पत्र लिहिलं आहे.
ramdas kadam
ramdas kadamsarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम (shivsena ramdas kadam) दरवर्षी शिवसेनच्या दसऱ्या मेळाव्याच्या (dasara melava) आयोजनात अग्रेसर असायचे, पण यंदा मात्र त्यांनी या मेळाव्याला जाण्याचे टाळले आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी 6 ऑक्टोबरला पाठविले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना उद्देशून रामदास कदम (ramdas kadam) यांनी हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरील आरोपांच्यासंदर्भातली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, त्याचा उल्लेख कदम यांनी पत्रात केला आहे. या क्लिप बाबत कदम यांनी त्यांची बाजू मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.

ramdas kadam
''माझ्या जीवात जीव असेपर्यंत पंकजा मुंडेंना सोडणार नाही : महादेव जानकर

दसरा मेळाव्यात रामदास कदमांना प्रवेश दिला जाणार नसल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. कदम मेळाव्याला उपस्थित राहणार का, याबद्दल उत्सुकता होती. पण कदमांच्या या पत्रामुळे चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. रामदास कदम यांच्यावर गेल्या तीन महिन्यांपासून ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर दोन महिने घरी उपचार सुरू होते. कोणत्याही इन्फेक्शनची लागण होऊ नये, म्हणून त्यांना गर्दी मध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला येऊ शकणार नाही असंही रामदास कदम यांनी पत्राद्वारे कळवल्याचे सुत्रांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला पक्षात दुर्लक्षित केलं गेलं असल्याने आपण नाराज आहोत असंही रामदास कदम यांनी पत्रात मांडल्याचं समजतं आहे. ''शिवसेनेत ज्यांना मंत्री पदं मिळाली आहेत असे काही मंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर हा माझ्यासारख्या जुन्या नेत्यांना संपवण्यासाठी करत आहेत,'' असंही यात नमूद करण्यात आलं आहे. शिवसेनेतले काही मंत्री आपल्याला साईडलाईन करत आहेत असं म्हणत रामदास कदम यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे.

दसऱ्याला शिवाजी पार्कवर (Shivaji park) शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर छोट्या पद्धतीने हा मेळावा साजरा होत आहे. यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार होते, पण मेळावा खुल्या मैदानात घेतला आणि हजारो लोक जमा झाले तर कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. त्यामुळे षण्मुखानंदमध्ये यावर्षीचा दसरा मेळावा घेण्याचं ठरवलं आहे. आज सांयकाळी सहा वाजता हा मेळावा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com