Uddhav thackeray, Rajan Salvi  sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वर खडाजंगी..? साळवींनी पराभवाचं खापर राऊतांवर फोडलं, ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'तुम्हाला भाजपमध्ये...'

Rajan Salvi News : शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या या वक्तव्यामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात होते. मात्र,या चर्चांमध्ये शनिवारी (ता.4) राजन साळवी यांनी मुंबई गाठत 'मातोश्री'वर थेट उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Deepak Kulkarni

Mumbai News : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे. यातच आता लवकरच कोकणातही ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राजापूर मतदारसंघातून राजन साळवी (Rajan Salvi) यांना पराभव पत्कारावा लागल्यानंतर ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. पण त्यांनी मातोश्री येथे जात ठाकरेंची भेट घेतली.पण यावेळी मातोश्रीवर जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा आहे.

भाजप प्रवेशाच्या चर्चाचं वादळ उठवल्यानंतर माजी आमदार राजन साळवी यांनी शनिवारी (ता.4) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेत आपल्या मनातील नाराजी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी आपल्या पराभवाला विनायक राऊत जबाबदार असल्याचा आरोपही केला. तसेच त्यांच्याविरोधातील तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला. यानंतर संतापलेल्या ठाकरेंनी साळवींनाच खडेबोल सुनावल्याची माहिती समोर येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी राजन साळवींना म्हणाले,आता काय विनायक राऊतांना पक्षातून काढू का? असा खोचक सवालही विचारला. याचवेळी त्यांनी साळवींना तुम्हांला भाजपसोबत जायचं असेल जा असंही म्हटल्याची चर्चा आहे. याच सगळ्या घडामोडीनंतर शनिवारी मातोश्रीवर चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर,खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. यानंतर साळवींनी माध्यमांशी संवाद साधतानाच आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं सांगितलं आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या या वक्तव्यामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात होते. मात्र,या चर्चांमध्ये शनिवारी (ता.4) राजन साळवी यांनी मुंबई गाठत 'मातोश्री'वर थेट उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामुळे ते म्हणाले, गेले दोन दिवस माझ्या मतदारसंघातील राजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा झाली. या चर्चांमध्ये त्यांच्या भावना समजून घेतल्या आज मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.त्यांना मतदारसंघात ज्या गोष्टी घडत होत्या, त्या उद्धवसाहेबांपर्यंत पोहोचवल्या. त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं, ते योग्य तो निर्णय घेतील.

2006 साली पोटनिवडणूक झालेला पराभव आणि आत्ता 2024 च्या निवडणुकीत झालेला फरक यात खूप फरक आहे. घटनाक्रमाबद्दल मी नक्कीच नाराज होतो. तो घटनाक्र मी त्यांना सांगितला', असे राजन साळवी म्हणाले. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे, असे साळवी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT