Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना पोलिसांसोबतच मिळणार खासगी सुरक्षा, मोठ्या उद्योग समुहाचा पुढाकार

Uddhav Thackeray Private Security : उद्धव ठाकरेंना एका खासगी उद्योग समूहाकडून सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. सुरक्षा रक्षकांनी आज मातोश्रीवर पाहणी केली.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा आहे. मात्र, गेल्या वर्षी त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली होती. ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस तैनात आहेत. मात्र, त्यांची संख्या कमी करण्यात आली होती. त्यामुळे कमी झालेल्या पोलिसांच्या स्थानी ठाकरेंच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत.

उद्धव ठाकरेंना एका खासगी उद्योग समूहाकडून सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. सुरक्षा रक्षकांनी आज मातोश्रीवर पाहणी केली. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या सुरक्षेसाठी खासगी उद्योग समुहाकडून आट सुरक्षा रक्षक पुरवण्यात आलेले आहेत.

Uddhav Thackeray
Sanjay Singh and ECI : मतदारयादीतून नावं हटवली जात असल्याच्या संजय सिंह यांच्या आरोपाला निवडणूक आयोगाचंही उत्तर, म्हटले...

गेल्यावर्षी उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेमध्ये कपात केल्यानंतर सरकारवर टीका करण्यात येत होती. त्यावेळी ठाकरेंच्या सुरक्षेमध्ये असलेली अतिरिक्त वाहने कमी केल्याचे सांगण्यात आले होते. आदित्य ठाकरे यांनी सुरक्षेच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.

उद्धव ठाकरेंच्या खासगी सुरक्षा घेण्यावरून मंत्री भरत गोगावले यांनी टीका केली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस असताना त्यांनी खासगी सुरक्षा घेणे म्हणजे पोलिसांवर अविश्वास दाखवण्या सारखे आहे, असे गोगावले म्हणाले.

ठाकरे परिवाराला सुरक्षा

उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा आहे तर त्यांच्या परिवातील सदस्यांना देखील वाय प्लस सुरक्षा सरकारकडून पुरवली जात आहे. आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे.

Uddhav Thackeray
MVA on fadnavis News : फडणवीसांचं कौतुक ते ही कुणी-कुणी करावं ? राऊत, अंधारे, कोल्हेनंतर अन् आता...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com