Manisha Waikar  Sarkarnama
मुंबई

Jogeshwari Assembly Elections Result: फेरमतमोजणीसाठी शिवसेना उमेदवाराची कोर्टात धाव; वायकर यांचा पोलिसांवर आरोप

Recount demand by Shiv Sena candidate sparks controversy: पोलिसांनी मनीषा वायकर यांच्या प्रतिनिधींना एक तास गेटवर अडवून ठेवल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांना अर्ज वेळेत पोहोचवता आला नाही.

Mangesh Mahale

Mumbai News: मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या मनीषा वायकर यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनंत बी नार यांनी पराभूत केले आहे. पराभूत उमेदवार मनीषा वायकर यांनी फेर मतमोजणी करण्याची मागणी केली होती. पण त्यांचा अर्ज वेळेत निवडणूक अधिकाऱ्यांपर्यत पोहचला नसल्याने फेरमोजणी घेण्यात आली नाही. याबाबत मनीषा वायकर यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

पोलिसांनी मनीषा वायकर यांच्या प्रतिनिधींना एक तास गेटवर अडवून ठेवल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांना अर्ज वेळेत पोहोचवता आला नाही,

पोलिसांच्या या दिरंगाईमुळे फेर मतमोजणीचा अर्ज वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांना देता आला नाही, असे मनीषा वायकर यांचे म्हणणे आहे.वेळेत अर्ज पोहोचवण्यास पोलिसांमुळे दिरंगाई झाल्याप्रकरणी मनीषा वायकर कोर्टात दाद मागणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत नार यांना 77044 मते मिळाली तर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वायकर यांना 75503 मते मिळाली आहेत. मनीष वायकर यांचा 1541 मतांनी पराभव झाला. वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. पण त्यांना अर्ज दाखल करण्यास विलंब झाला होता.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात फेरमतमोजणी करण्यात आली होती. यामध्ये शिवसेनेचे रविंद्र वायकर विजयी झाले आहेत. केवळ 48 मतांनी फेरमतमोजणीत रवींद्र वायकरांचा विजय झाला होता तर उद्धव ठाकरेंचंया शिवसेनेचे अमोल कीर्तिकरांचा पराभव झाला होता.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ या शिवसेनेसाठी महत्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे रविंद्र वायकर यांनी विजयाची हॅट्रीक साधली होती. आता ते खासदार आहेत. त्यांची पत्नी मनीषा वायकर यांचा निवडूकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांचा 1541 मतांनी पराभव झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT