narayan rane- vaibhav naik  sarkarnama
मुंबई

यंदाचा राजकीय शिमगा आरे ला कारेच; वैभव नाईकांचा इशारा

Narayan Rane| Vaibhav naik| मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian)हिची बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राणेंनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी दिंडोशी न्यायालयात अर्ज केला होता. आज दिंडोशी /न्यायालयाने काही अर्टी-शर्तीसह राणे पिता-पुत्राचा जामीन मंजूर केला आहे.

यावर शिवसेना नेते वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''दिशा सॅलियनच्या कुटुंबातील लोकांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली. नारायण राणे, नितेश राणे यांना अटीशर्तींसह जामीन मंजूर केला आहे. नारायण राणे महाविकास आघाडीतील अनेक लोकांवर आरोप करत असल्यामुळे त्यांना आता पदे मिळाली आहेत. पण सरकार आणि पोलिसांवर दबाव आणून राणेंची गुन्हेगारी थांबणार नाही. कोर्टाच्या पायऱ्या कशा चढाव्या लागतात हे आम्ही दाखवून देऊ, यंदाचा राजकीय शिमगा हा आरे ला कारे असाच होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजपमध्ये जाण्यापुर्वी नारायण राणेंना आपला पक्ष भाजपमध्येे विलीन करावा लागला. त्यांची पार्श्वभुमीच गुन्हेगारीची आहे. पण महाविकास आघाडी हे सहन करणार नाही. अशी वक्तव्य होत राहिली तर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाच्या तक्रारीवरून हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे .

''दिशा सालियनवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्या वेळी एका मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. नारायण राणे व नितेश राणे हे दिशा सालियनसोबत मृत्यूपूर्वी झालेल्या बलात्काराबाबत विधान केले आहे. दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हा रद्द करण्यासाठीही याचिका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT