Aaditya Thackeray Worli Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray Worli : आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात CM फडणवीसांनी ठोकला 'परिवर्तना'चा शड्डू!

Aaditya Thackeray Worli Stronghold BJP Show of Strength with CM Devendra Fadnavis at Dahi Handi : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भाजपने डझनभर हंड्यांच्या माध्यमातून आदित्य यांच्यासह महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला.

Pradeep Pendhare

Mumbai Dahi Handi 2025 politics : मुंबईत दहीहंडी उत्सवानिमित्ताने राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडीची संधी साधली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या युवासेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भाजपने डझनभर हंड्यांच्या माध्यमातून आदित्य यांच्यासह महाविकास आघाडीला घेरण्याची संधी साधली.

जांबोरी मैदानावर भाजपकडून 'परिवर्तना'ची दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी फोडून परिवर्तनाचा निर्धार केला.

भाजपचे (BJP) पदाधिकारी संतोष पांडे यांनी या ‘परिवर्तन दहीहंडी महोत्सव 2025’चे आयोजन केले होते. यामध्ये सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ वरळीतील दहीहंडी पथकांसाठी राखून ठेवण्यात आलेला होता. यामुळे वरळीतील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

जांबोरी मैदानावर गेल्या चार वर्षांपासून भाजपपुरस्कृत दहीहंडी उत्सव साजरा होतो. यंदादेखील मुंबईतील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव याठिकाणी झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. याठिकाणी दिवसभर राजकीय नेत्यांनी मांदियाळी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, संजय उपाध्याय उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी ‘परिवर्तन दहीहंडी’ फोडली. ते म्हणाले, "वरळीतील लोकांना चांगले दिवस आणायचे आहेत. त्यासाठी आपल्याला अधिक चांगले काम करायचे आहे." इथल्या लोकांना या विभागातदेखील परिवर्तन करायचे असून या वेळी नक्कीच परिवर्तन होईल, असा आशावाद फडणवीसांनी व्यक्त केला.

राजकीय पक्षांची कुरघोडी

भाजपकडून वरळी परिसरामध्ये विविध दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या माध्यमातून भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत, आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. पूर्वी या मैदानावर माजी मंत्री सचिन अहिर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उत्सव होत असे, त्यानंतर शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेने इथं आपला जम बसवत प्रस्थ वाढवले.

भाजपनं मैदान मारलं...

याच मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे आमदार झाल्याने इथल्या दहीहंडी उत्सवाची रंगत अधिक वाढली. उत्सवासाठी जांबोरी मैदान मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार चुरस देखील बघायला मिळू लागली; मात्र गेल्या चार वर्षांपासून भाजपने मैदान मिळवत आपली राजकीय स्थिती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT