Ahilyanagar Gram Panchayat : सरपंचपदी निवड होताच 'रडला'; एक दिवसाच्या 'बाल'सरपंचानं, गाव कारभार संभाळताच, शाळेसाठी घेतला मोठा निर्णय!

Ahilyanagar Chichondi Patil Gram Panchayat Child Sarpanch Sarthak Kulathe Takes School Decisions : चिचोंडी पाटील इथल्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधील सार्थक कुलथे याची एक दिवसासाठी सरपंच म्हणून निवड झाली आहे.
Child Sarpanch Sarthak Kulathe
Child Sarpanch Sarthak KulatheSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar child sarpanch news : अहिल्यानगरच्या चिचोंडी पाटील इथल्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या नववीमधील सार्थक कुलथे यानं लोकशाही मार्गानं निवडून येत संपूर्ण एक दिवस ग्रामपंचायतीचा कारभार संभाळला.

सरपंच शरद पवार यांच्या संकल्पनेतून,सार्थक याने गाव कारभार संभाळताना, शाळेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर विकासकामांचा आढावा घेताना, त्याने शाळेसाठी तत्काळ 17 कचराकुंड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं स्वागत देखील करण्यात आलं.

लोकशाही मार्गानं न्यू इंग्लिश स्कूलमध्ये निवडणूक (Election) प्रक्रिया राबवण्यात आली. यातून सार्थक कुलथे याची निवड झाली. निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात सार्थक कुलथे याला आनंदाश्रू अनावर झाले. शाळेत राबवण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेचं स्वागत केलं अन् गावकऱ्यांनी कौतुक देखील केलं.

सरपंचपदासाठी (Sarpanch) शाळेतून 23 जणांनी उमेदवार अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जसाठी प्रत्येकी 50 रुपये अनामत रक्कम भरावी लागली. अर्ज माघारीवेळी सहा जणांनी माघार घेतली. निवडणूक रिंगणात 17 उमेदवार होते. त्यानंतर उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. आश्वासने दिली, भाषणे झाली.

Child Sarpanch Sarthak Kulathe
Bogus voting allegation : बोगस मतदान, थोरातांच्या आरोपांनी घायाळ विखे संतापले; कोणाचा अपमान करताय? 40 वर्षांचा हिशोब सांगितला

शाळेत मतदान केंद्र तयार केले. बूथरचना करून विद्यार्थ्यांनी रांगेतून मतदानाचा अधिकार बजावला. प्रत्येक मतदाराच्या बोटावर शाई लावण्यापासून ते मतपत्रिका देण्यापर्यंतचे सर्व सोपस्कार पार पाडत गुप्त पद्धतीने मतदान झाले. निवडणूक निरीक्षक म्हणून प्राचार्य चंद्रकांत शिंदे, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षक राम कोकाटे यांनी काम पाहिले.

Child Sarpanch Sarthak Kulathe
Vaibhav Naik : अनिल परब यांच्यानंतर आता वैभव नाईक रणांगणात, थेट राणे कुटुंबावर हल्लाबोल; म्हणाले, 'वाळू माफीया...'

अन्य शिक्षकांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर मतमोजणी करण्यात आली. अखेर सार्थक कुलथे याने बाजी मारली. 15 उमेदवार आपली अनामत रक्कमही वाचवू शकले नाही. 13 मते बाद ठरली. या निवडणुकीत सार्थक रमेश कुलथे याने 148 मते मिळवून विजय मिळवला. या विजयानंतर केलेल्या भाषणात सार्थकच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सार्थक कुलथे यांच्या विजयाची घोषणा करून त्याला प्रमाणपत्र दिले.

चिंचोडी पाटील गावाचे सरपंच शरद पवार यांनी या निवडणुकीचे स्वागत केले. सरपंच पवार यांनी पुढाकार घेत, एक दिवसासाठी सार्थक याला गावचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी दिली. सार्थक कुलथे याने गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर विकासकामांचा आढावा घेतला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याने शाळेसाठी तत्काळ 17 कचराकुंड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

सार्थक याच्या या निर्णयाचं गावकऱ्यांनी कौतुक केलं आहे. तसंच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी देखील स्वागत केलं आहे. शरद पवार यांनी लोकशाही घडविण्यासाठी शाळेनं घेतलेल्या निवडणुकीचं स्वागत केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com