CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena MLA Disqualification: 'माझ्याकडं फक्त 16 दिवस...'; आमदार अपात्रता प्रकरणावर नार्वेकरांचं मोठं विधान

Rahul Narwekar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सध्या मॅरेथॉन सुनावणी सुरु आहे.

Ganesh Thombare

Mumbai News: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला वेग आला असून, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मॅरेथॉन सुनावणी सुरु आहे. मंगळवारी दिवसभर सुनावणी झाल्यानंतर बुधवारीही सुनावणी पार पडली. या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची‌ फेरसाक्ष आणि उलट तपासणी घेण्यात आली.

या सुनावणीदरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. मात्र, ही सुनावणी सुरु असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं आहे. ज्या गतीने सुनावणी सुरू आहे, त्यावर विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या सुनावणीसाठी फक्त 16 दिवस असल्याचे नार्वेकरांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नार्वेकर नेमकं काय म्हणाले ?

ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष आणि उलट तपासणी शिंदे गटाच्या वकिलांकडून घेण्यात येत आहे. यावेळी सुनील प्रभू हे मुद्देसूद उत्तरं देत नसल्याचे शिंदे गटाच्या वकिलांचे म्हणणे आहे. तर सध्या सुरु असलेली सुनावणी ही धिम्यागतीने सुरु असल्याचं सांगत यावर राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली.

याबाबत बोलताना नार्वेकर म्हणाले, "माझ्याकडं फक्त 16 दिवस आहेत. त्यात सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे. मला 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणाची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठी फक्त 16 दिवसांचा कालावधी आहे. जर या गतीने सुनावणी पुढे जात असेल तर या सर्व प्रकरणाची सुनावणी पूर्ण करणे अवघड होईल", असं नार्वेकर म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस होता. आजची सुनावणी आता संपली असून गुरुवारी पुन्हा 11 वाजता सुनावणी सुरु होणार आहे.

आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांना डेडलाईन दिल्यानंतर आता सुनावणीला वेग आला आहे. सध्या मॅरेथॉन सुनावणी घेण्यात येत आहे. त्यामुळे या सुनावणीत पुढे काय-काय घडतं, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT