Mumbai News: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष घेण्यात आली. या सुनावणीत दोन्ही गटांच्या वतीने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले, तर आज झालेल्या युक्तिवादावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना सुनावल्यानंतर आता या प्रकरणाच्या सुनावणीला वेग आला असून, आमदार अपात्रतेसंदर्भातील याचिकेवर आता मॅरेथॉन सुनावणी होणार आहे. बुधवारपासून 24 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पार पडणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानंतर तीन दिवसांच्या सुट्टीनंतर 28 ते 3 डिसेंबर या दरम्यान पुन्हा सहा दिवस सुनावणी होणार आहे, तर रविवारी 3 डिसेंबरलाही सुनावणी असणार आहे. आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली. यानंतर आता व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही साक्ष नोंदवण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी 11 वाजता पुन्हा सुनावणी सुरू होणार असून, 11 ते 5.30 अशी दोन सत्रात सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान, आजच्या सुनावणीत दोन्ही गटाला कागदपत्रं सादर करण्याचे सांगण्यात आले होते. यानंतर ठाकरे गटाने कागदपत्रं सादर केले. मात्र, शिंदे गटाने कागदपत्रं सादर करण्यासाठी आणखी वेळ मागितला. त्यांना 24 तारखेपर्यंत वेळ देण्यात आला. त्यामुळे 24 तारखेला शिंदे गटाकडून कागदपत्रं सादर करण्यात येणार आहेत.
या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली असून, वेळकाढूपणा केला जात आहे; पण डिसेंबरमध्ये निकाल द्यावाच लागेल, असे परब म्हणाले. आता मॅरेथॉन होणाऱ्या सुनावणीत दोन्ही गटांकडून काय युक्तिवाद करण्यात येतो, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.