Shiv Sena MLA Disqualification  Sarkarnama
मुंबई

Rahul Narvekar Final Decision : 20 जून 2022 ते 10 जानेवारी 2024; जाणून घ्या अपात्रता प्रकरणाचा प्रवास

MLA Disqualification Case: घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत, पक्ष हे महत्त्वाचे घटक महत्त्वाचे ठरले.

Mangesh Mahale

Mumbai News: शिवसेना पक्षामध्ये दीड वर्षामध्ये उभी फूट पडली आणि राज्याच्या सत्तेला एक मोठी कलाटणी मिळाली. याप्रकरणी ठाकरे विरुद्ध शिंदे वादात आज विधानसभाध्यक्ष आमदार अपात्रताप्रकरणी महत्त्वाचा निकाल लागला. राहुल नार्वेकर यांचा हा निकाल 'बेंचमार्क निकाल' आहे. या निकालाकडे आमदार, राजकीय पक्ष आणि सामान्यांचेही याकडे डोळे लागले होते.

नार्वेकरांनी निकालवाचन करताना न्यायालय आणि दोन्ही गटांच्या वकिलांचे आभार मानले. खरी शिवसेना कुणाची, हा नार्वेकरांसमोरचा विषय होता. घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत, पक्ष हे महत्त्वाचे घटक महत्त्वाचे ठरले, असे नार्वेकरांनी सांगितले.

काय म्हणाले राहुल नार्वेकर...

  • याचिकेवरील सुनावणीनंतर हा निकाल देताना खरी शिवसेना कुणाची, हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच

  • पक्षात बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कोणाचा, हा मुद्दाही विचारात घेणं महत्त्वाचं होतं.

  • एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नव्हता.

  • खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच

  • मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदेंचीच शिवसेना

20 जून 2022 - समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदेंची बंडखोरी

23 जून 2022 - बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचं शिवसेनेकडून पत्र

24 जून 2022 - पक्षाच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची उचलबांगडी; शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची मान्यता

25 जून 2022 - विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून सोळा बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस

26 जून 2022- आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसा आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून आव्हान. विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर निर्णय होईपर्यंत आमदार अपात्रतेवर निर्णय घेण्यास मनाई करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल; अखेर सत्तासंघर्ष पोहोचला सर्वोच्च न्यायालयात

27 जून 2022- बंडखोर आमदारांना अपात्रतेपासून सर्वोच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा; बहुमताची चाचणी न घेण्यासंदर्भात हंगामी आदेश देण्याची शिवसेनेकडून न्यायालयास विनंती, मात्र न्यायालयाचा नकार

28 जून 2022 - देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट, ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची राज्यपालांना विनंती

29 जून 2022 - राज्यपालांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश, बहुमत चाचणीला शिवसेनेच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान मात्र याचिका फेटाळून लावत महाविकास आघाडीला 30 तारखेला बहुमत चाचणीला सामोरं जावंच लागेल, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, त्यानंतर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

30 जून 2022 - एकनाथ शिंदेसमर्थक आमदारांसह गुवाहाटीतून गोव्यात आणि मग गोवामार्गे मुंबईत दाखल; शिंदे आणि फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा केला दावा; राज्यपाल भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं फडणवीसांकडून जाहीर, मात्र गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांकडून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

1 जुलै 2022 : विधानसभाध्यक्षपदासाठी भाजप-शिंदे गटाकडून राहुल नार्वेकरांच्या नावाची घोषणा जाहीर करण्यात आली.

2 जुलै 2022 : ठाकरे आणि शिंदे गटाकडून परस्परविरोधी व्हीप जारी करण्यात आला.

3 जुलै 2022 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नव्या विधानसभाध्यक्षांची निवड केली गेली, तर गटनेतेपदी एकनाथ शिंदेंना मान्यता मिळाली.

4 जुलै 2022 : एकनाथ शिंदे सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 मतांनी विधानसभेत मंजूर झाला. शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला.

7 जुलै 2022 : ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेत 39 बंडखोर आमदारांवरील अपात्रता याचिकेवर उपाध्यक्षांचा निर्णय व्हावा, यासाठी तातडीनं सुनावणीची मागणी केली, मात्र सुप्रीम कोर्टानं ही मागणी फेटाळली.

11 जुलै 2022 : बंडखोर आमदारांवरील सुनावणी 11 जुलै रोजीच होईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यामुळं एकनाथ शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला.

23 ऑगस्ट 2022 : सर्वोच्च न्यायालयाकडून 5 सदस्यीय घटनापीठाची स्थापना

17 ऑक्टोबर 2022 : धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला.

15 डिसेंबर 2023 : दहा दिवसांची मुदतवाढ मिळावी, यासाठी राहुल नार्वेकरांचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज 10 जानेवारी 2024 पर्यंत निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांना मुदतवाढ

30 ऑक्टोबर 2023 : 31 डिसेंबर 2023 पर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल द्या, विधानसभाध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

10 जानेवारी 2024 : शिवसेना कुणाची, यावर नार्वेकरांनी निकाल दिला. तो म्हणजे शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT