Shivsena MLA Disqualification Result Live : मोठी बातमी! ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्रच अमान्य; नार्वेकरांनी सांगितली कारणं

Shivsena UBT Fraction : शिवसेना फुटल्यानंतर दोन्ही गटांकडून परस्परविरोधी ३४ याचिका दाखल केल्या...
Uddhav Thackeray, Rahul Narwekar
Uddhav Thackeray, Rahul NarwekarSarkarnma
Published on
Updated on

Sena MLA Disqualification Result : ठाकरे-शिंदेंमधील सत्तासंघर्षाच्या निकालाचे वाचन विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. निकालाच्या पहिल्याच टप्प्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. नार्वेकरांनी ठाकरे गटाने सादर केलेले प्रतिज्ञापत्रच अमान्य केले आहे. तसेच ठाकरे गटाने २०१८ मध्ये पक्षाच्या घटनेत केलेली दुरुस्तीही नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले.

शिवसेना फुटल्यानंतर दोन्ही गटांकडून परस्परविरोधी ३४ याचिका दाखल केल्या आहेत. त्या पाच गटांत विभागल्याचे नार्वेकरांनी सांगितले. यात याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात, तर चौथ्या गटात याचिका क्रमांक १९ चा समावेश आहे. तसेच व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप असल्याचे म्हटले आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे, असे म्हणत नार्वेकरांनी प्रत्येक गटातील ठळक मुद्दे वाचले.

Uddhav Thackeray, Rahul Narwekar
Sharad Pawar On Rahul Narwekar : निकालानंतर शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला; म्हणाले...

दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना निवडणूक आयोगाला दिल्या होत्या. त्यातील एका घटनेवर तारीखच नसल्याचे समोर आले. ती घटना ठाकरेंनी दिली होती. त्यामुळे शिवसेनेने दिलेली घटना मान्य नसल्याचे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले. तसेच २०१८ पक्षाने केलेली घटनेत जी दुरुस्ती ही चूक होती. गटनेत्याने ती घटना जमा केली नसल्याने ती अमान्य करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाकडे असलेल्या पक्षाच्या घटनेचा आधार नार्वेकरांनी निकाल देताना आधार घेतला आहे. आयोगाने २०२३ मध्ये दिलेली शिवसेनेची घटना मान्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले, तर २०१८ मध्ये ठाकरे गटाने केलेली घटनादुरुस्ती नियमबाह्य आहे. तसेच उलटतपासणीला आले नाहीत, म्हणून ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य करण्यात आल्याचे नार्वेकरांनी निकालाचे वाचन करताना स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray, Rahul Narwekar
Sena MLA Disqualification Result : 'मी पुन्हा सांगतो..' ; शिवसेनेच्या महानिकालावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com