CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट; सुनावणी अंतिम...

MLA Disqualification Hearing: पुढील तीन दिवसांत दोन्ही गटाकडून....

Ganesh Thombare

Mumbai News: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मागील काही दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. ठाकरे गटाचे नेते आणि प्रतोद सुनील प्रभू यांची‌ फेरसाक्ष पूर्ण झाली. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांचीही उलट तपासणी झाली. आता या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे.

आमदार अपात्रता प्रकरणाची अंतिम टप्प्यातील सुनावणी सोमवारपासून सलग तीन दिवस चालणार आहे. सोमवारी सकाळी 8.30 वाजता ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत हे बाजू मांडणार आहेत. तर अंतिम सुनावणीत युक्तिवाद करण्यासाठी ठाकरे गटाला दीड दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच मंगळवारी व बुधवारी दीड दिवस शिंदे गटाचे वकिल युक्तिवाद करणार आहेत. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकिल महेश जेठमलानी हे बाजू मांडणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला वेग आला असून ही सुनावणी अंतिम टप्प्याकडे आली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत दोन्ही गटाकडून काय-काय युक्तिवाद करण्यात यतो, ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

निकालासाठी नवी डेडलाइन

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाकडे 21 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय देण्यासाठी 10 जानेवारीची मुदत दिलेली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना आता आमदार अपात्रता प्रकरणावर 10 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय द्यावा लागणार आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT