Shiv Sena MLA Disqualification Update : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण सुनावणीचे वेळापत्रक ठरलं; अंतिम निकालाची तारीख...

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : "साक्षीदारांची यादी तयार केली जाईल.."
Shiv Sena MLA Disqualification Update Uddhav Thackeray Vs Eknath Shinde :
Shiv Sena MLA Disqualification Update Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण सुनावणीचे वेळापत्रक निश्चित झाल्याची माहिती विधिमंडळ सूत्रांकडून मिळाली आहे. १३ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबरदरम्यान हा युक्तिवाद होणार असून, २३ नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यांमध्ये अंतिम सुनावणी पार पडेल, अशी माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

Shiv Sena MLA Disqualification Update Uddhav Thackeray Vs Eknath Shinde :
Satara Political News : आमदार अपात्रता प्रकरणात जाणूनबुजून चालढकल : शशिकांत शिंदेंचा आरोप

काल रात्री ( २६ सप्टेंबर) शिवसेनेच्या आमदारांना सुनावणीबाबतचं वेळापत्रक पाठवण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबरदरम्यान यु्क्तिवाद होऊन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे. १३ ते २० ऑक्टोबरदरम्यान दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर २० ऑक्टोबर रोजी सर्व कागदपत्रे एकत्र करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

Shiv Sena MLA Disqualification Update Uddhav Thackeray Vs Eknath Shinde :
Shivsena MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरण; नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना

याशिवाय २० ऑक्टोबरला दोन्ही गटाला अधिकचे काही कागदपत्रे द्यायची असतील, तर त्यासाठी त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. २७ ऑक्टोबरला दोन्ही गट आपलं म्हणणं मांडतील. ६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपले मुद्दे लिखित स्वरूपात सादर करतील. यानंतर त्यांना दावे-प्रतिदावे करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे.

१० नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांवर सुनावणी पार पडेल. २० नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी तयार केली जाईल. २३ नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल. त्यानंतर दोन आठवड्यांमध्ये अंतिम निकाल देण्यात येणार आहे. साधारण डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात यासंदर्भातला निकाल येण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com