CM Shinde, Uday Samant, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Case: 'उद्धव ठाकरेंनीच पुन्हा भाजपसोबत...'; सामंतांचा मोठा गौप्यस्फोट

Shiv Sena MLA Disqualification : ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून उदय सामंत यांची उलट तपासणी सुरु आहे.

Ganesh Thombare

Nagpur Political News : शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरु आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांची ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून उलट तपासणी सुरु आहे. यावेळी सामंतांना काही प्रश्न विचारण्यात आले.

या प्रश्नांची उत्तरं देताना "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं", असा गौप्यस्फोट सामंतांनी केला. उदय सामंत यांची ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून उलट तपासणी सुरु आहे. तर दीपक केसरकर यांचीही ठाकरे गटाच्या वकिलांकडून उलट तपासणी होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सामंतांनी काय गौप्यस्फोट केला ?

"ज्यावेळी महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन होत होतं, त्यावेळी गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासमोरच अनेक आमदारांनी नाराजी बोलून दाखवली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भविष्यात पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं", असं सामंत म्हणाले.

दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीच्या दिरंगाईसंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नार्वेकरांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलटतपासणी झाली. त्यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्यांची उलटतपासणी सुरु आहे.

(Edited by-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT