Rajesh Kshirsagar : माजी आमदाराचं शेजाऱ्यांशी भांडण; मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल..

Kolhapur Crime : रात्रंदिवस पार्ट्यांचा शेजाऱ्यांना त्रास, पोलिसांत तक्रार
Rajesh Kshirsagar
Rajesh KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतुराज यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. मात्र गुन्हा नोंद होत नसल्याने संबंधित कुटुंबातील तरुणीने आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारपेठ परिसरात क्षीरसागर ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्या शिवगंगा संकुल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबाकडून राजेंद्र वरपे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, मारहाणीचा सिसिटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजेंद्र वरपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते शिवगंगा संकुल हे शनिवार पेठेत आपल्या कुटुंबासमवेत राहतात. याच ठिकाणी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते वारंवार पार्ट्या करत असतात. यावेळी त्यांचा नेहमीच रात्री उशिरापर्यंत आराडाओरड सुरु असते. त्याचा त्रास होत असल्याचे क्षीरसागर यांना वारवांर सांगितले. मात्र प्लॅट विकून दुसरीकडे जा, असे त्यांनी सांगितल्याचा वरपेंनी केला.

Rajesh Kshirsagar
Supreme Court : कलम 370 हटविणे योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

क्षीरसागर यांनी शुक्रवारी रात्री मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर वरपेंनी पोलिसांकडे धाव घेतली. याबाबत वरपेंनी सांगितले, 'शुक्रवारी रात्री पुन्हा पार्टी सुरु होती. त्यावेळी होणाऱ्या त्रासाबद्दल क्षीरसागर यांना सांगण्यास वरपे गेले होते. त्यावेळी स्वतः क्षीरसागर, त्यांचा मुलगा व घरातील कामगारांसह इतर काही लोकांनी वरपे यांच्यासह त्यांचा मुलगा, मुलगी यांना मारहाण, शिवीगाळ केली. तसेच तुझे हातपाय तोडतो. तुला गोळ्या घालतो, तुला काय करायचे कर,' अशी धमकी दिल्याचा आरोप वरपे कुटुंबियांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या घटनेनंतर पोलिसांत तक्रार देणेसाठी जात असताना पुन्हा क्षीरसागर, त्यांचा मुलगा ऋतुराज यांनी लिप्ट जवळून ओढून मारहाण केली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. त्याबाबतची तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र गुन्हा नोंद होत नसल्याने मुलगी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल करून, संबंधित क्षीरसागर कुटुंबावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, माजी आमदार राजेश क्षीरसागर काय बोलणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Rajesh Kshirsagar
Cricketnama 2023 : शिवेंद्रराजे, जयकुमार गोरेंच्या बॅटिंगवर फडणवीसांचा विश्वास; सातारचे खेळाडू नागपूर गाजवणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com