CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट; निकालाबाबत...

MLA Disqualification Hearing: सर्वोच्च न्यायालय हा निकाल देण्यासाठी वेळ वाढवून देण्याची शक्यता...

Ganesh Thombare

Mumbai Political News: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर काही दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची सध्या उलट तपासणी सुरु असून काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची‌ फेरसाक्ष पूर्ण झाली. आता साक्ष नोंदवण्याचे काम सुरु आहे. मात्र, असे असतानाच आता आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

ठाकरे आणि शिंदे गटाच्या साक्ष नोंदवणे आणि उलट तपासणीचे काम 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, सुनावणी जरी वेळेत पूर्ण झाली तरी या प्रकरणाचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

तसेच हा निकाल देण्यासाठी वेळ वाढवून देण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती. या अर्जावर आज न्यायालय आदेश देण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालय काय आदेश देतं, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निकाल देण्याची मुदत वाढवून घेण्यासाठी यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. कारण या अपात्रता प्रकरणात जवळपास दोन लाख पानांचे दस्तावेज असून 21 ते 31 डिसेंबर या कालावधीत निकालाचे लेखन शक्य नसल्याची माहिती समोर येत आहे.

अधिवेशन काळातही सुनावणी

आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 31 डिसेंबरपर्यंत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीला वेग आला. अगदी हिवाळी अधिवेशन काळात देखील सुनावणी नियमित पार पडत आहे.

सध्या शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी सुरु आहे. आता 20 डिसेंबरपर्यंत दोन्ही गटाच्या साक्षी नोंदवणे, तसेच उलट तपासणीचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT