Rohit Pawar : रोहित पवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, "…तर विधानसभा अध्यक्ष राजीनामा देणार!"

Shivsena MLA Disqualification Case : " निर्णय घेण्याची वेळ आल्यावर..."
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांच्या संमतीनं वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे.आता अंतिम सुनावणी सोमवारी 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत सुनावणी पूर्ण होणार आहे. उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे हे सगळं सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांविषयी खळबळजनक विधान केले आहे.

कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी, तरुण, शेतपिकांचे कोसळलेले भाव, स्पर्धा परीक्षा, बेरोजगारी यांसारख्या अनेक मुद्द्यांवरुन युवा संघर्ष यात्रा काढली होती. 10 जिल्हे, 30 तालुके असा टप्पा पार केला होता. मात्र, शेवटच्या क्षणी रोहित पवार आक्रमक झाल्याने नागपुरात मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. आता रोहित पवार यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविषयी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

Rohit Pawar
Nashik NCP News : शरद पवारांचा वाढदिवस अन् इच्छुकांचा 'मौके पे चौका'

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार अपात्रेतच्या प्रकरणावर बोट ठेवलं.पवार म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना संविधानानुसार निर्णय घ्यायचा झाला, तर तो एकनाथ शिंदेंच्या विरोधात जाणार आहे. पण अशी परिस्थिती निर्माण झाली,तर राजकीय अडचण होऊ शकते.त्याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.निर्णय घेण्याची वेळ आल्यावर विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास आश्चर्य वाटायला नको असा दावा रोहित पवारांनी केला आहे.

तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांनी पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेल्या विधानावरही आमदार रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,युवकांबद्दल कुणीही शंका घेतली नाही पाहिजे.गरीब मुलांना पीएचडीचा अभ्यास करताना राहायला पैसे नसतात.म्हणून ती मुलं सरकारकडे येतात.एखाद्या श्रीमंताचा मुलगा सरकारकडे आला असता का? क्षमता असलेल्या मुलांवर तुम्ही शंका घेत असाल, तर योग्य नाही. त्यामुळे अजित पवारांच्या वक्तव्याचा मी निषेध व्यक्त करत असल्याचेही पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"...तर ती चोरीच!"

यावेळी त्यांनी अजित पवारांवर मोठं विधान केले. ते म्हणाले,अजित पवारांना विरोधी पक्षनेते या करा या पत्रावर मी सही केली होती.पण त्याच पत्रातील मजकूर बदलून माझ्या सहीचा दाखला देत त्यांना माझा पाठिंबा असल्याचे म्हणून सांगत असतील तर ही एकप्रकारे चोरीच असल्याचे ते आमदार रोहित पवार म्हणाले. (NCP)

Rohit Pawar
Pratap Simha : नेमके कोण आहेत प्रताप सिम्हा? ज्यांच्या 'PASS'वर संसदेत शिरला तरूण!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com