Shivsena MLA Disqualification  Sarkarnama
मुंबई

Shivsena MLA Disqualification Result : उद्धव ठाकरेंना पहिला झटका; 2018 ची घटना नार्वेकरांनी फेटाळली...

Shivsena 16 MLA Disqualification Case : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालवाचनावेळी महत्त्वाच्या घडामोडींवर बोट ठेवले.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन सध्या सुरू आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

या निकालात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केवळ ठळक मुद्दे वाचन केले आहे. यात शिवसेनेची 1999 ची घटना वैध असून 2018 मध्ये ठाकरेंनी केलेली घटनादुरुस्ती मान्य नसल्याचं वक्तव्य राहुल नार्वेकरांनी केलं आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी पहिला धक्का मानला जात आहे.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) यांनी निकालवाचनावेळी महत्त्वाच्या घडामोडींवर बोट ठेवले. त्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून घटनांची माहिती मागवण्यात आली होती. पण ती प्राप्त झाली नाही. यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घटनेची प्रत प्राप्त केली आहे. 1999 ची घटना शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे दाखल झालेली अभिलेखावर असलेली एकमेव घटना असल्याचे ते म्हणाले.

नार्वेकर म्हणाले, प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 1999 च्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. कारण 2018 मध्ये पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे सुधारित पदांची रचना ग्राह्य धरली जाणार नाही. 2018 ची घटना ग्राह्य धरता ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची मागणी होती. पण या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. त्यामुळे ती स्वीकारता येणार नाही, असं नार्वेकर यांनी निकालात स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कुणाचीही हकालपट्टी करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीत चर्चा करणे आवश्यक आहे. पक्षप्रमुखाचे मत अंतिम याच्याशी सहमत नाही. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांचे मत पक्षाचे मत असू शकत नाही. पद रचनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असतो.त्यामुळे शिंदेंना काढण्याचा निर्णय मान्य करता येणार नाही.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पदावरून हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नव्हता.ते कुणालाही पक्षातून काढू शकत नाहीत.मनात आल्यानंतर कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार त्यांना नाही. पक्षप्रमुखांना सर्वोच्च अधिकार देणे लोकशाहीसाठी घातक असल्याचेही निरीक्षणही विधानसभा अध्यक्षांनी यावेळी नोंदवले.

शिवसेना पक्षप्रमुख हे पद सर्वोच्च असेल असे २०१८ च्या घटनेत नमूद करण्यात आले आहे. पण त्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सर्वोच्च असेल असेही म्हटले आहे. २०१८ च्या पदाच्या रचना नार्वेकरांनी वाचून दाखवली.21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले. पण 22 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडल्याचे विधिमंडळ सचिवालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.खरी शिवसेना कुणाची हे ठऱवण्याचा अधिकार मलाच असल्याचे विधानही नार्वेकरांनी यावेळी केले.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबरपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. 20 डिसेंबर 2023 रोजी ही सुनावणी संपली. एकूण 34 याचिकांचा सहा गटांत समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत हा निकाल वाचला जाणार आहे. सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे बाराशे पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे. परिणामी, सहा गटांतील निकालांचे केवळ सारांशवाचन सध्या सुरू आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT