Vinod Tawde : विनोद तावडेंवर पुन्हा मोठी जबाबदारी; 'इनकमिंग'साठी उत्सुक असलेल्यांबाबत भाजपचा मोठा निर्णय

BJP Political News : आयारामांची होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मोठा निर्णय घेतला आहे.
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचवेळी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंगलाही वेग आला आहे. यात भाजपप्रवेशासाठी इच्छुकांची मोठी रांग आहे. त्याच धर्तीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. यात भाजपने विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी सोपविली आहे.

मोदी-शाहांच्या नेतृत्वाखाली भाजपने आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये 400 प्लसचा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपने आपल्या दिग्गज नेत्यांपासून ते स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनाही मैदानात उतरवले आहे. दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येण्यास उत्सुक असलेल्या राजकीय नेत्यांसाठी महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली आहे. आयारामांची होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मोठा निर्णय घेतला आहे. या समितीचे संयोजक विनोद तावडेंना (Vinod Tawde) केलं आहे.

Vinod Tawde
Nagpur NDCCB Bank : ‘पळणारा नाही, भिडणारा नेता’ म्हणत कार्यकर्त्यांचा जल्लोष!

दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत भाजपची ही समिती निर्णय घेणार आहे. या समितीच्या परवानगीनंतरच बाहेरच्या पक्षातील नेत्यांसाठी भाजपचे दरवाजे खुले होतील. या समितीच्या संयोजकपदी विनोद तावडे यांची वर्णी लागली आहे. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी या समितीची बुधवारी (ता. 10) घोषणा केली.

दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. भाजप(BJP)कडून 8 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे संयोजकपद महाराष्ट्रातील विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या समितीत 8 जणांमध्ये 4 केंद्रीयमंत्र्यांचा समावेश भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडवीया यांचा समावेश आहे. विनोद तावडे, तरुण चूग आणि सुनील बन्सल या तीन राष्ट्रीय महासचिवांचादेखील सहभाग असणार आहे.

विशेष म्हणजे समितीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनाही स्थान देण्यात आले आहे. या समितीच्या अंतर्गत प्रत्येक राज्यात एक समिती तयार केली जाणार आहे. ही समिती इतर नेत्यांच्या भाजपा पक्षप्रवेशाबाबत निर्णय घेणार आहे.

R...

Vinod Tawde
MLA Disqualification Case : शिंदेंचं बंड ते आमदार अपात्रता प्रकरण; जाणून घ्या, सत्तासंघर्षाचा उजळणीनामा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com