Naresh Mhaske and Rahul Narvekar Sarkarnama
मुंबई

Shivsena MLA Disqualification Result : विधानसभा अध्यक्षांवर कुणाचा दबाव? ; अपेक्षित निकालानंतरही नरेश म्हस्केंचा सवाल!

Naresh Mhaske and Rahul Narvekar : जाणून घ्या, मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात जल्लोष सुरू असताना, नरेश म्हस्के असं का म्हणाले?

Mayur Ratnaparkhe

पंकज रोडेकर -

Thackeray Group Vs Shinde Group Maharashtra Politics :  शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. शिवाय, हा निकाल देताना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य करत शिंदे गटातील 16 आमदारांना नार्वेकर यांनी पात्र ठरवले आहे.

मात्र विशेष बाब म्हणजे नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरवल्याने, अनेकांना आश्चर्य वाटत आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के(Naresh Mhaske) यांनीही प्रतिक्रिया दिली, मात्र त्यांनी एक मोठा प्रश्नही उपस्थित केला, ज्यावरून चर्चा रंगत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नरेश म्हस्के म्हणाले, 'जर खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची मानून विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे बारा आमदार बाद का नाही केले, अपात्र का नाही केले? यामागे कोणाचा दबाव विधानसभा अध्यक्षांवर आहे का? असा सवाल शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. संपूर्ण निकाल पत्रिका वाचून त्या पुढील धोरण आम्ही ठरवणार आहोत, असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.'

राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी आणि शिवसैनिकांनी ठाण्याच्या टेंभी नाका येथील आनंद आश्रमात मोठा जल्लोष केला. तसेच, आनंद दिघे यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी अभिवादनही केले. त्यांनतर तिथे उपस्थितत शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष निर्णयाचे वाचन करत होते. तेव्हा टेंभी नाका येथे शिवसेनेच्या विभागप्रमुखांची एक बैठक सुरु होती.या बैठकी दरम्यान निर्णयाची माहिती मिळताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केला.

या निकालानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे या निकालावर मोठं विधान केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT