MLA Clash Of Shinde group : एकनाथ शिंदेंचे दोन आमदार एकमेकांना भिडले का? प्रवक्ते म्हस्के म्हणाले...

Two MLA Clash Of Eknath Shinde group : राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या मंत्रिपदामुळे शिंदे गटात अस्वस्थता?
Two MLA Clash Of Eknath Shinde group :
Two MLA Clash Of Eknath Shinde group :Sarkarnama

Mumbai News : राज्याच्या राजकीय वर्तुळातून आता मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटामध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा होती. अजित पवारांच्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आल्यानंतर शिंदे गटातील आमदार नाराज झाल्याची माहिती आहे. मंत्रिपदावरून शिंदेंच्या दोन आमदारामध्ये बाचाबाची झाली असल्याची एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले होत. (Latest Marathi News)

Two MLA Clash Of Eknath Shinde group :
Sharad Pawar Speech : राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष तर आमचे नेते सत्तेत कसे घेतले...; शरद पवारांचा थेट पंतप्रधानानां सवाल

यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हस्के म्हणाले, "शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही. काल आमची बैठक झाली. यापुढील संघटनात्मक बांधणी कशी असेल, लोकसभेची कशी तयारी करायची आहे? याची चर्चा बैठकीत झाली. काही खोडसाळ बातम्या पसरत आहेत. असा काही विषय नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वैयक्तिक कारणांमुळे दौरावरून परतले आहेत."

दरम्यान, मंत्रिपदावरील दाव्यांमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली होती, अशी बातमी आली होती. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत:ला मध्यस्थीसाठी यावे लागले. मुंबईत दोन आमदार एकमेकांना भिडले. आमदारांच्या या वादावादीमुळेच शिंदेंना आपला नियोजित नागपूर दौरा सोडून आमदारांचे भांडण सोडवण्यासाठी तातडीने मुंबईला परत यावे लागले, असे सांगण्यात येत आहे.

Two MLA Clash Of Eknath Shinde group :
NCP Political Crisis : शरद पवारांना मोठा धक्का ! वायबी सेंटरच्या बैठकीला उपस्थिती लावलेल्या आमदाराचं २४ तासांतच अजितदादांना समर्थन

शिंदे आमदार मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत :

राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार येऊन, आता एक वर्षांपेक्षा अधिक काळ लोटून गेला. मात्र अजूनही सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झालेले नाही. मंत्रिमंडळ पहिल्या विस्तारामध्ये भाजपाचे आणि शिवसेनेचे अनुक्रमे प्रत्येकी ९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. मात्र शिंदेंचे इतर आमदार मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत.

जुलै महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी आशा शिंदे गटाच्या आमदारांना होती. इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता अजित पवार यांची सरकारमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यांच्या नऊ आमदारांनी शपथही घेतली. यामुळे आता शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता असल्याची जोरदार चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com