Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena MLA Disqualification Result Live : ठाकरेंनी शिंदेंची केलेली हकालपट्टी अयोग्य; काय सांगते शिवसेनेची घटना ?

Sunil Balasaheb Dhumal

Sena MLA Disqualification Result : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे-शिंदेंमधील असलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालाचे वाचन केले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या घटनेतील काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. यातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंची केलेली हकालपट्टी पक्षाच्या घटनेनुसारच अयोग्य असल्याचे निरीक्षण नोंदवले.

निकाल देताना नार्वेकर म्हणाले, शिवसेनेच्या घटनेत २०१८ मध्ये केलेली दुरुस्ती नियमबाह्य आहे. तसेच ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या घटनेवर तारीख नसल्याने ती ग्राह्य धरता येणार नाही. तसेच उलटतपासणीला हजर राहिले नसल्याने ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्रही नार्वेकरांनी फेटाळले आहेत. यासह शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरेंनी शिंदेंची केलेली हकालपट्टीही अमान्य केली आहे.

शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख असूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकट्याला कुणालाही पक्षातून हकालपट्टी करता येत नसल्याकडे नार्वेकरांनी लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्री शिंदेंवर कारवाई करताना ठाकरेंनी पक्षातील राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचेही नार्वेकरांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकट्या ठाकरेंना कुणालाही पक्षातून काढता येणार नाही, अशी तरतूद शिवसेनेच्या घटनेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवसेनेत २० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड करून सुरतमार्गे गुवाहाटी गाठली होती. त्यानंतर ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र शिंदेंच्या गोटात आमदार आणि खासदारांची संख्या वाढत गेली. त्यानंतर त्यांनी गोवामार्गे मुंबईत येऊन भाजपच्या साथीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, ठाकरे गटाने शिंदेंसह बंडखोर १६ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT