Shahaji Patil  Sarkarnama
मुंबई

Shahaji Patil News : '..तर मी पुन्हा उद्धवसेनेत जाण्यास तयार' ; शहाजी पाटलाचं मोठं विधान!

Shahaji Patil criticized Uddhav Thackeray : खासदार श्रीकांत शिंदेंना थेट भगवंताचे अंश संबोधले, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

Pankaj Rodekar

Thane News : उध्दव ठाकरे यांनी कबूल करावे, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी एका व्यक्तीला जरी आरोग्य सेवेसाठी एक लाख दिले असेल, तर मी पुन्हा उध्दवसेनेत जाण्यास तयार आहे. असे विधान शिवसेना (शिंदे गट) आमदार शहाजी पाटील यांनी रविवारी ठाण्यात एका कार्यक्रमात केले.

यावेळी पुढे बोलताना, एकदा 'मातोश्री' निवास्थान लॉक झाल्यावर तीन महिने उघडत नव्हते. फक्त ते पापलेट घेऊन जाणाऱ्या माणसासाठी उघडायचे. अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात लहान मुलांसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना, शहाजी पाटील(Shahaji Patil) यांनी माणसे तडफडून मरत होते. आम्ही आमदार म्हणून उध्दव ठाकरे यांचे नाव टाकून पत्र देत होतो, पण एक रुपया ही मिळाला नाही, अशी टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शपथ घेतल्यानंतर माझ्या तालुक्यात दोन कोटी रुपयांहून अधिकचा निधी आला. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त चारच तास विश्रांती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी एवढे काम केले आहे की त्यांचे नाव इतिहासात लिहिले जाईल. असेही त्यांनी यावेळी म्हटले.

खासदार शिंदे हे भगवंताचे अंश -

'पैंगबर, येशू ख्रिस्त, राम, कृष्णाने, वामन, परशूरामाचा अवतार झाला. आता भगवान या पृथ्वीवर यायला तयार नाहीत. त्यामुळे परमेश्वराने दयेचा अंश असलेला एक माणूस या पृथ्वीवर पाठविला. जेणेकरून गोर-गरिबांची सेवा होईल. त्यामुळे भगवंताचे अंश असलेले आणि दयेचा रूप असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी सातत्त्याने सेवा सुरू ठेवली आहे.' असे विधान शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT