Thane News : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई रविवारी गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांची विचारपूस करण्यासाठी ठाण्यातील रुग्णालयात येणार असे सांगण्यात आले. पालकमंत्री ठाण्यात दिलेल्या वेळेपेक्षा एक तास उशीरच आल्यावर पहिले त्यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जन्मदिनानिमित आयोजित केलेल्या ज्युपिटर रुग्णालयातील कार्यक्रमाला हजेरी लावली आणि मनोगत व्यक्त करत खासदार शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी जखमी महेश गायकवाड यांची जाऊन विचारपूस केली.
या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह आमदार शहाजी पाटील, माजी खासदार मिलिंद देवरा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर मंडळींचे सत्कार करण्यात आले. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांना धनगर समाजाची ओळख असलेली घोंगडी आणि काठी दिली.
यावेळी बोलताना, पालकमंत्र्यांनी राज्यात कुठे काही घडले तर तेथे मदतीसाठी पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून जातात, असा उल्लेख करत आरोग्याबाबत मदत करणारे हे राज्यातील पहिलेच कुटुंब आहे. असं ते म्हणाले. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा येथे मोफत आरोग्य तपासणी, औषध वाटप अशा कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
दोन वाजता पालकमंत्री येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पालकमंत्री ठाण्यात एक तास उशीरा आले. यामुळे मनोगत मांडताना पालकमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे आणि जमलेल्यांची दिलगिरी व्यक्त केली.
शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात गोळीबार केला. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात धाव घेत महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची माहिती डाॅक्टरांकडून घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नंतर आज (रविवारी)ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे महेश गायकवाड यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले. मात्र, रुग्णालयातून बाहेर आल्यावर मात्र शंभूराजे देसाई हे महेश गायकवाड यांचे नावच विसरले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.