Sunil Raut News, Sanjay Raut News, Maharashtra Political Crisis News sarkarnama
मुंबई

राऊत शिंदे गटात जाणार..ठरली केवळ अफवाच ; म्हणाले, मी शिवसेनेतच..

मी शिवसेनेतच आहे, शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार," असे ठामपणे सुनील राऊत यांनी माध्यमांना सोमवारी सांगितले.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत (Sunil Raut) हेदेखील एकनाथ शिंदे यांना सामील होणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. यावर संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Sunil Raut news update)

"गुहावाटीमध्ये काय आहे? मी शिवसेनेचा सदस्य आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत, मी शिवसेनेतच आहे, शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार," असे ठामपणे सुनील राऊत यांनी माध्यमांना सोमवारी सांगितले.

"महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला निधी मिळाला नाही," अशी टीका बंडखोरांना केली आहे, यावर सुनील राऊत यांनी भाष्य केलं. "प्रत्येकाला महाविकास आघाडी सरकारकडून निधी मिळाला आहे, बंडखोर आमदारांना ही माझ्यापेक्षा जास्त निधी मिळाला आहे. उद्धव ठाकरे नक्की जिंकतील,"असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.(Maharashtra Political Crisis News)

रविवारी सकाळपासून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) हेदेखील एकनाथ शिंदे यांना सामील होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. "सुनील राऊत लवकरच गुवाहाटीत जातील," असे सांगितले जात होते. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातील चिंता वाढली होती. मात्र, काही तासांनंतर ही केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले. या सगळ्यावर संजय राऊत यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत भाष्य केले.

"सुनील राऊत माझ्यासोबतच आहेत. तुम्ही त्यांना पाहतच असाल. तेच सर्व मोर्चा सांभाळत आहेत," असे राऊत म्हणाले. आजच्या पत्रकार परिषदेच्या वेळेस सुनील राऊत उपस्थित होते.

"बंडखोरांची तुम्ही पूर्वीची वक्तव्यं तपासून बघा, हेच लोक सांगत होते की, भाजप शिवसेनेला संपवत आहे. भाजपने शिवसेनेचे लोक पाडले. याच लोकांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले," अशी टीका सुनील राऊत यांनी केली.

सुनील राऊत म्हणाले..

  • शिवसेनेचे जितके आमदार वाचतील त्यांना घेऊन आम्ही महाराष्ट्रात पक्ष वाढवू.

  • नारायण राणे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे हे पक्ष सोडून गेल्यानंतरही शिवसेना वाढली.

  • शिवसेनेचे ५६ आमदार आहेत, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली ते आगामी काळात १०० च्या वर जातील

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT