Devendra Fadnvis, Sanjay Raut  sarkarnama
मुंबई

आमच्या हातात ईडी द्या, मग बघा, फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील!

राज्यसभा निवडणुकीवर शिवसेनेने भाजपला पुन्हा डिवचलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा जिंकून भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला. संख्याबळानुसार निवडून येऊ न शकणारी ही जागा त्यांनी निवडून आणली. कोल्हापूरचे धनजंय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभूत केलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut latest news)

राज्यसभा निवडणुकीवर शिवसेनेने भाजपला पुन्हा डिवचलं आहे. "केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन भाजप निवडणुका जिंकण्याचा डाव टाकत आहे," अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. "आमच्या हातात जर 48 तासांसाठी ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील," असा जोरदार टोला संजय राऊत यांनी भाजपला हाणला.

संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात रात्रीच्या अंधारात निवडणूक आयोगाला हाताशी धरुन राज्यातले नेते काय करत होते, गृहखात्याचे कसे फोन येत जात होते, हे आम्हाला माहिती आहे. यंत्रणा आमच्याकडेही आहे,"

"महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युती टिकवण्याचं श्रेय नक्कीच गोपीनाथ मुंडे यांना जातं. पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये एकाकी पाडण्याचा फडणवीस यांचा डाव आहे," अशी टीका राऊत यांनी केली. "पंकजा मुंडे आणि शिवसेनेचे जिव्हाळ्याचं नाते आहे. आम्‍हाला पंकजा मुंडे यांची चिंता करण्याचा अधिकार आहे," अशी भूमिका राऊत यांनी माध्यमांसमोर मांडली.

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे (Shivsena) संजय राऊत, काँग्रेसचे (Congress) इमरान प्रताप गढी, राष्ट्रवादीचे (NCP) प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे हे विजयी झाले आहे. मात्र महाविकास आघाडीची १० मते फुटल्याने सहाव्या जागवरचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT