Narendra Modi, mohan Bhagwat, Sanjay Raut.jpg Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On Narendra Modi : "सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी कॉमनमॅनने...", मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्याचा आधार घेत राऊतांची मोदींवर टीका

Jagdish Patil

Sanjay Raut On Narendra Modi : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून राऊतांची तोफ भाजप विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे.

त्यामुळे ते भाजपवर आणि खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा आधार घेत राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

या देशात एक व्यक्ती स्वतःला विष्णूचा तेरावा अवतार आणि सुपरमॅन समजते, ती व्यक्ती मी रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवलं सांगते पण ती व्यक्ती मणिपूर आणि जम्मू-काश्मिरमधील हिंसाचार थांबू शकत नाही, अशा शब्दात राऊत यांनी मोदींना (Narendra Modi) डिवचलं आहे. झारखंडमधील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी म्हटलं की, "काही लोकांना सुपरमॅन व्हायचं आहे. ते एवढ्यावर थांबत नाहीत तर त्यांना सुपरमॅन झाल्यानंतर देवता, आणि देवता बनल्यानंतर भगवान व्हायचं आहे."

भागवत (Mohan Bhagwat) यांच्या याच व्यक्त्यावरुन आता विरोधकांनी मोदींवर टीका करायला सुरुवात केली आहे. मोदी स्वतःला नॉन बायोलॉजिक पद्धतीने जन्माला आलो असं म्हणतात, ते स्वतःला देवापेक्षा मोठे मानतात त्यामुळे भागवतांनी मोदींनाच टोला लगावल्याचं ते म्हणत आहेत. याच मुद्द्यावरुन आता संजय राऊत यांनी देखील मोदींवर निशाणा साधला.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भागवत यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, "या देशात एक व्यक्ती आहे जी स्वतःला विष्णूचा तेरावा अवतार समजते. त्या व्यक्तीला असं वाटतं प्रभू श्रीरामांचे बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या मंदिरात घेऊन गेलो. ते नसते तर अयोध्येत राम भगवानांची प्राणप्रतिष्ठा झाली नसती. ती व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजते.

तसंच ती स्वतःला नॉन बायोलॉजिक पद्धतीने जन्माला आलो, म्हणजे मला देवाने जन्माला घातलं, असं सांगून लोकांना भयभीत करते. ती व्यक्ती मी रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवलं सांगते पण मणीपुर आणि जम्मू-काश्मिरमधील हिंसाचार थांबू शकत नाही." अशा शब्दात राऊतांनी मोदींवर टीका केली.

तर मला असं वाटतं त्याच व्यक्ती विषयी (मोदींबद्दल) मोहन भागवत बोलले आहेत. काही व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजतात पण सुपरमॅनच्या पायाखालची बहुमताची सतरंजी या सामान्या माणसाने खेचून घेतली तो कॉमन मॅन आज सुपरमॅन आहे, असंही राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT