Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या छळाच्या तक्रारीवर सुहास दिवसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Pune District Collector Suhas Diwse Harassment Complaint : ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांनी सुहास दिवसे यांच्याविरोधात पोलिसांकडे छळाची तक्रार केली आहे.
Pooja Khedkar, Suhas Diwse
Pooja Khedkar, Suhas DiwseSarkarnama
Published on
Updated on

Pune : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकार सुहास दिवसे यांच्याविरोधात छळाची तक्रार करत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे खेडकर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या तक्रारीनंतर दिवसेंनी पहिल्यांदाच मीडियाला प्रतिक्रिया दिली.

दिवसे यांनी शुक्रवारी सकाळी मीडियाशी बोलताना सविस्तर बोलण्याचे टाळले. यावर बोलण्यासारखे काहीच नाही. तक्रारची प्रत मला मिळालेली नाही. त्यामुळे त्यावर काही बोलू शकत नाही, असे दिवसेंनी स्पष्ट केले. त्यांनी सरकारला पाठवलेल्या अहवालानंतरच खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली होती.

Pooja Khedkar, Suhas Diwse
Sharad Pawar Nashik Tour : शरद पवारांच्या दौऱ्यात ठरणार अजित पवारांच्या आमदाराची विकेट घेण्याची रणनीती

दरम्यान, पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दुसरी नोटीस पाठवून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकर यांची भेट घेऊन ही नोटीस दिली. खेडकर यांना याआधी नोटीस देऊन 18 जुलैला पुणे येथे उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, त्या उपस्थित न राहिल्याने दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली.

पूजा खेडकर सध्या वाशिम येथील विश्रामगृहावर मुक्कामी आहेत. त्यांनी वाशिम पोलिसांकडे दिवसे यांच्याविरोधात तक्रार केली होती. तिथून ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून खेडकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. थेट जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

Pooja Khedkar, Suhas Diwse
BJP Core Committee Meeting : भाजपच्या बैठकीत अजितदादांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेवरून घमासान; नेमकं काय घडलं?

पूजा खेडकर यांचे जिल्हा प्रशिक्षण रद्द करून त्यांना तत्काळ लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी येथे बोलावण्यात आले आहे. 23 जुलैपूर्वी हजर व्हावेच लागेल, असे आदेशही खेडकर यांना दिले आहेत. राज्य सरकारने 11 जुलै रोजी सविस्तर अहवाल दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दिवसे यांच्या अहवालानंतरही राज्य सरकारने हे पाऊल उचलले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com