Sanjay Raut, Uddhav Thackeray ,Amit Shah Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut on Amit Shah : "ठाकरेंना लाज वाटली पाहिजे," शाहांच्या या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं; म्हणाले...

Sanjay Raut Reply Amit Shah : "नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रात येऊन जनतेचं मनोरंजन करतात," असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

Akshay Sabale

Political News : गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी मंगळवारी ( 5 मार्च ) छत्रपती संभाजीनगर येथून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगर येथे सभेला संबोधित केले. या वेळी शाहांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना लक्ष्य करत त्यांची लाज काढली. याला खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

अमित शाह काय म्हणाले?

"बाळासाहेब ठाकरे यांना फक्त महाराष्ट्र नाही तर देशातील जनता त्यांच्या सिद्धांतामुळे मानते. उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, ज्यांच्याबरोबर ते बसले आहेत, त्यांनी कलम 370, सर्जिकल स्ट्राइक, राम मंदिर, छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध केला.

मग तुम्ही त्यांच्याबरोबर कसं राहू शकता. कोणत्या तोंडानं तुम्ही जनतेपुढं येणार. हे लोक सिद्धांताचं, देशाचं राजकारण करत नाहीत, तर हे कुटुंबाचं राजकारण करतात," अशी टीका अमित शाहांनी ( Amit Shah ) उद्धव ठाकरेंवर केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"हजारो काश्मिरी पंडित निर्वासितांचं जीवन जगताहेत"

अमित शाहांनी केलेल्या टीकेचा संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) समाचार घेतला आहे. संजय राऊत म्हणाले, "नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रात येऊन जनतेचं मनोरंजन करतात. आम्ही भाजपबरोबर नव्हतो, तरीही कलम 370 हटवल्यानंतर शिवसेनेनं पाठिंबा दिला होता.

शाहांनी आपली स्मरणशक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे. कलम 370 हटवून काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा? काश्मिरी पंडित माघारी आले का? हजारो काश्मिरी पंडित निर्वासितांचं जीवन जगत आहेत. त्यांचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत येत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही."

"काश्मीरची जनता आणि तरुण बेरोजगार"

"सर्जिकल स्ट्राइकबाबत भाजप जनतेशी खोटं बोलली आहे. अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राइक झाला का? याबद्दल आताही शंका उपस्थित होत आहे. काश्मीरची जनता आणि तरुण बेरोजगार आहेत. अखंड भारत करू, पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू ही 2014 आणि 2019 मध्ये भाजपची घोषणा होती. काय केलं तुम्ही? याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे," असा हल्लाबोल राऊतांनी अमित शाहांवर केला.

"मते मागण्यासाठी शहिदांचा बाजार मांडला"

"2019 मध्ये पुलवामा घडलं किंवा निवडणुका जिंकण्यासाठी घडवलं गेलं. मते मागण्यासाठी शहिदांचा बाजार मांडला. याची तुम्हीला लाज वाटली पाहिजे," अशा शब्दांत राऊतांनी अमित शाहांचा समाचार घेतला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT