Satara Lok Sabha Election 2024 : पवारांच्या बालेकिल्ल्यातच उमेदवार ठरेना; महायुती अन् महाविकास आघाडीला पर्याय सूचेनात

Satara Lok Sabha Election News : महायुतीतून तीन घटक पक्ष जागेवर दावा करत असून, नक्की जागा कोणाला सुटणार यावर अद्याप एकमत नाही.
shrinivas patil sharad pawar udayanraje bhosale
shrinivas patil sharad pawar udayanraje bhosalesakarnama
Published on
Updated on

लोकसभेचे ( Lok Sabha Election 2024 ) बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्ष उमेदवार ठरविण्यात व्यस्त आहेत. भाजपने ( bjp ) देशात 195 लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातही महायुती आणि महाविकास आघाडी आपले उमेदवार फायनल करत असून, पुढील काही दिवसांत जाहीर केले जातील. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभेचा ( Satara Lok Sabha Constituency ) उमेदवार अजूनही निश्चित होत नसून नुसत्याच चर्चा रंगल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीला सक्षम पर्यायी उमेदवार सूचत नसल्याने उमेदवार निवड हाच विजयाचा फॅक्टर ठरू शकतो. 

shrinivas patil sharad pawar udayanraje bhosale
BJP Political News : मोदी- शाहांचं विशेष 'विदर्भ प्रेम' पण गडकरींशिवाय...

सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार यांच्या गटाला जागा सुटणार हे निश्चित आहे. शरद पवार ( Sharad Pawar ) यांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील ( Shrinivas Patil ) यांचेच नाव आघाडीवर आहे. श्रीनिवास पाटील यांचे वय आणि पुत्रप्रेम यामुळे नाव आघाडीवर असतानाही ते इच्छुक नसल्याचे सांगितले जात आहे. खासदार पुत्र सारंग पाटील यांच्या नावालाही कराड, पाटण भागातून पसंती दिली जात आहे. मात्र, पूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार करून उमेदवार ठरवावा लागणार आहे. जिल्हाध्यक्ष सुनील माने हेही इच्छुक असून, त्यांना कराड उत्तर आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून पसंती आहे. अशावेळी सातारा लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघाचा विचार करून उमेदवार पसंतीस असा द्यावा लागणार आहे. त्यामुळे ऐनवेळी शरद पवारांची धक्का देण्याची रणनीती अमलात आल्यास आश्चर्य वाटायला नको.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीविरोधात महायुती असा सामना या ठिकाणी रंगणार आहे. महायुतीतून तीन घटक पक्ष जागेवर दावा करत असून, नक्की जागा कोणाला सुटणार यावर अद्याप एकमत नाही. शिवसेना शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव यांनी तयारी सुरू केली असून, माघार घेणार नसल्याचे सांगत आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सातारची जागा सुटेल असे जवळपास निश्चित झाल्याचे महायुतीच्या गोट्यातून सांगितले जात असले तरी उमेदवार कोण हे निश्चित नाही. भाजपकडून तयारी जोरदार झाली असली तरी उमेदवारांचे नाव स्पष्ट झाले नाही. अशा गोंधळाच्या परिस्थितीत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. छत्रपती उदयनराजे हे अपक्ष, अजित पवार गट की भाजप जागा आपल्याकडे घेत त्यांना उमेदवारी देणार हे अद्याप ठरेना. 

shrinivas patil sharad pawar udayanraje bhosale
Loksabha Election 2024 : महायुतीकडून आणखी एका पाटलांच्या एन्ट्रीने 'धाराशिव'ला स्पर्धा तीव्र

शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात भाजपकडून धक्का देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून जय्यत तयारी केली आहे. मात्र, उमेदवार नक्की कोण द्यायचे हे महायुतीत घटक पक्षांना सूचत नसल्याचेच दिसत आहे. दुसरीकडे पवारांचा बालेकिल्ला असला तरी कोणत्या उमेदवारांच्या नावावर शिक्का मारायचा हेही ठरेना. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती असो, की महाविकास आघाडी यांना सक्षम पर्याय सूचत नसल्यानेच अद्याप इच्छुकांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जात नाही.

R

shrinivas patil sharad pawar udayanraje bhosale
Loksabha Election 2024 : काँग्रेसकडे उमेदवाराची वानवा, भाजपकडे रीघ तर ठाकरे गटावर दबाव!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com