Uddhav Thackeray, Rrhul Kanal Sarkarnama
मुंबई

Shivsena Politics : ठाकरे गटाच्या 'या' मोठ्या नेत्याला कायदेशीर नोटीस; आरोप सिद्ध करा अन्यथा...

Jui Jadhav

Mumbai Political News :

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याने शिवसेनेत गेलेल्या एका नेत्यावर आरोप केले होते. त्या आरोपांवरून शिवसेनेच्या नेत्याने ठाकरे गटाच्या नेत्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हा नेता म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आहेत. संजय राऊतांनी खोटे आरोप केले असून त्यांनी माफी मागावी यासाठी ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) निकटवर्तीय होते. पण त्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आता ते प्रतिस्पर्धी झाले आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल कनल (Rahul Kanal) यांच्यावर आरोप केले होते. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि संदीप राऊत यांची ईडीतर्फे (ED) चौकशी करण्यात आली. मात्र या सगळ्यात ज्यांनी घोटाळा केला आहे ते आता सत्तेत सामील झाले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी राहुल कनल यांच्या विरोधात केला होता.

खिचडीची कामे ज्यांना मिळाली त्यांची यादी जाहीर करा, त्यातली किती लोक त्या गटांमध्ये गेली आहेत? ते जाहीर करा, लुटीचा पैसा घेऊन संरक्षणासाठी पळालेली ही लोक आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊ द्या, सर्वांचं वस्त्रहरण करतो, असे संजय राऊत म्हणाले होते.

मात्र या सगळ्या विरोधात आता राहुल कनल यांच्या वकिलांनी राऊत यांना माफी मागावी, यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आणि जर संजय राऊत यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात हायकोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...तर राजीनामा देऊ!

राऊतांनी राहुल कनल आणि अमेय घोले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे आरोप सिद्ध झाले तर मात्र आम्ही दोघेही राजीनामा देऊ, असे प्रत्युत्तर राहुल कनल यांनी दिले आहे. त्याचवेळी त्यांनी राऊतांना प्रश्न विचारला आहे.

जे लोक त्यांचे दौरे सांभाळायचे ते सुनील बाळा कदम, सुजित पाटकर यांचे बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर आलेले आहेत. जर आम्ही खोटे बोलत असू, तर तुम्ही सीसी टीव्ही फूटेज शोधा. कोविडकाळात आणि कोविडनंतर हे लोक महापौर बंगल्यावर का जायचे? कुठल्या अधिकाराने जायचे? किती अधिकाऱ्यांना राऊतसाहेबांचे फोन गेलेत, हे रेकॉर्ड वर काढा, सगळ्यांचे रेकॉर्डस् आहेत, असे आव्हान कनल यांनी दिले आहे.

सुजित पाटकर, सुनील बाळा कदम किंवा इतर कुणीही असोत. या घोटाळ्यात जे जे लोक सापडले आहेत. जे ईडी व इतर संस्थांनी सिद्ध केलेले आहेत. यात आमची नावे कुठेही नाहीत. फक्त खिचडी नाही तर तर इतर मेडिकल एजन्सीज आहेत त्यांची तुम्ही माहिती काढा. यात सुनील बाळा कदम आणि सुजित पाटकर कुठे कुठे सहभागी आहेत ते कळेल, अशा शब्दांत अमेय घोले यांनी संजय राऊतांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला होता.

राऊत खासदारकी सोडणार?

रेमडेसीवीरचा घोटाळा असो, बॉडी बॅग घोटाळा असो किंवा खिचडी घोटाळा असो, यातील कुठल्याही घोटाळ्यात माझे किंवा अमेय घोले यांचे नाव आढळले तर आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीचा राजीनामा देऊ. आमच्यात हे धाडस आहे.

पण संजय राऊत यांच्यात हे धाडस आहे का? जर धाडस असेल तर तर त्यांनी वंदनीय बाळासाहेबांची शपथ घ्यावी की जर आमचे नाव कुठल्याही घोटाळ्यात आढळले नाही, तर ते खासदारकीचा राजीनामा देतील, असे खुले आव्हान राहुल कनाल यांनी दिले आहे

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT