Shrikant Shinde News : श्रीकांत शिंदेंचा 'तो' फोटो ट्विट करत गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut : 'महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण?
Shrikant Shinde,  hemant dabheka
Shrikant Shinde, hemant dabhekasarkarnama
Published on
Updated on

Mumbai : पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर संजय राऊत यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आहेत. श्रीकांत शिंदे यांचा 'बाळाराजे' म्हणून वारंवार उपहासात्मक उल्लेख संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे. आता थेट श्रीकांत शिंदे यांच्या सत्काराचा फोटो ट्विट करत सत्कार करणारी व्यक्ती कोण, असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी थेट आरोपीच्या पिंजऱ्यात श्रीकांत शिंदे यांनाी उभे केले आहे.

Shrikant Shinde,  hemant dabheka
Uddhav Thackeray Konkan Tour : उद्धव ठाकरे यांच्या रडारवर आज कोण ?

'महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!', असे आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

सत्कार करणारी व्यक्ती कोण?

संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde ) यांचा सत्कार करणारी व्यक्ती गुंड हेमंत दाभेकर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हेमंत दाभेकर हा मोहोळ टोळी संबंधित आहे. तो गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत होता आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. विशेष म्हणजे दाभेकर हा जामिनावर बाहेर असताना त्याने श्रीकांत शिंदे यांचा सत्कार केला आहे.

'त्या' आरोपाची चौकशी करा

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोट्यावधी रुपये दिल्याचे आपल्या जबाबात सांगितले आहे. जबाब हाच पुरावा आहे. त्यामुळे या प्रकरणात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Shrikant Shinde,  hemant dabheka
Sanjay Raut : संजय राऊतांनी केली किरीट सोमय्यांची मिमिक्री; म्हणाले, 'एकनाथ शिंदेंकडे हिशोब...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com