Deepak Kesarkar Sarkarnama
मुंबई

Deepak Kesarkar : आणखी एक बडा नेता भाजपत प्रवेश करणार ? केसरकरांनी सूचक विधान करत फोडला राजकीय बॉम्ब

Ganesh Thombare

Mumbai News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. यानंतर भाजप आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. एका मोठ्या नेत्याला भाजपमध्ये आणण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. (Deepak Kesarkar on Jayant Patil)

यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे. "जयंत पाटील हे मोठे नेते आहेत, त्यांना जायचं तिकडे ते जाऊ शकतात," असं केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर आता शरद पवार गटातील मोठ्या नेत्याला गळाला लावण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 'मिशन 45' साठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी दिग्गज नेते मंडळी थेट मैदानात उतरत बैठका, सभा, मेळावे घेत आहेत. याबरोबरच जर लोकसभेला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर दुसऱ्या पक्षांतील महत्त्वाचे नेते आपल्याबरोबर असले तर ते सोप्प होईल, अशी रणनीती यामागे असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रावर भाजपचं लक्ष

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मराठवाड्यात भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. यानंतर आता भाजपने पश्चिम महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्षानुवर्षे बालेकिल्ला राहिला आहे. पण मागील काही वर्षांत भाजपने या भागातदेखील चांगला शिरकाव केला. मात्र, अजून पूर्ण पकड भाजपला पश्चिम महाराष्ट्रात करता आलेली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एका दिग्गज नेत्याला सोबत घेण्याच्या हालचाली भाजप करत असल्याची चर्चा आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT