BJP News : भाजपचा आणखी एक राजकीय धक्का? पश्चिम महाराष्ट्रातील पवारांच्या निकटवर्तीयाला पक्षात घेण्याच्या हालचाली

NCP Leader Join BJP : राष्ट्रवादी अभेद्य असताना या नेत्याचं अजित पवारांशी सख्य नव्हतं. पण...
Sharad Pawar | Devendra Fadnavis
Sharad Pawar | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील ( शरदचंद्र पवार ) एका बड्या नेत्याला भाजपात आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्या नेत्याचा लवकरच भाजपात प्रवेश होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Sharad Pawar | Devendra Fadnavis
Nitesh Rane: देवरा, चव्हाणांनंतर काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपच्या वाटेवर; राणेंचं सूचक टि्वट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी ( Lok Sabha Election 2024 ) काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ( शरदचंद्र पवार ) काही जोरदार धक्के देण्याची रणनीती भाजपश्रेष्ठींनी आखली आहे.

लोकसभेच्या राज्यातील 48 पैकी 42 हून अधिक जागा जिंकायच्या असतील, तर या दोन पक्षांतील महत्त्वाचे नेते आपल्याबरोबर आणले पाहिजेत तरच ते शक्य होईल, अशी या रणनीतीमागील भूमिका आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे लक्ष्य आता पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्षानुवर्षे बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या काही वर्षांत भाजपने या भागात चांगला शिरकाव केला असला तरी अजून पूर्ण पकड भाजपला या भागात घेता आलेली नाही.

त्यामुळे शरद पवारांबरोबर असलेल्या या भागातील एका दिग्गज नेत्याला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीतील बंडात शरद पवारांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार, मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वाचे खाते देणार, अशा बातम्या मध्यंतरी होत्या. पण, सतत या नेत्यानं हे वृत्त फेटाळलं होतं.

Sharad Pawar | Devendra Fadnavis
CM Shinde Sangli Tour : जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री उतरणार; शिवसेनेकडून जोरदार तयारी...

‘तो’ नेता कोण?

शरद पवारांबरोबर असलेल्या या नेत्याला पक्षात आणले तर सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये शक्ती वाढेल, असे भाजपचे समीकरण आहे. दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव असलेल्या या नेत्याचे सहकार क्षेत्रातही मोठे नाव आहे. या नेत्याच्या भाजपच्या राज्यातील आणि दिल्लीतील एका नेत्याबरोबर भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

या नेत्याला भाजपमध्ये आणून त्यांच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी द्यायची. अथवा त्या नेत्यालाच लोकसभेला उभे करायचे या दोन्ही पर्यायांबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस अभेद्य असताना या नेत्याचे अजित पवारांशी फारसे सख्य नव्हते. पण, शरद पवारांचे खास म्हणून त्यांचे महत्त्व पक्षात कायम राहिले.

Sharad Pawar | Devendra Fadnavis
Aditya Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे 'मातोश्री'वर येऊन रडायचे; आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं

अशोक चव्हाणांमुळे मराठवाड्यात मिळाले बळ

अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशाचा फायदा नांदेड, परभणी, हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघांत होईल. लोकसभेच्या जागावाटपात नेहमीच शिवसेनेला मराठवाड्यात अधिक जागा मिळाल्या. शिवसेनेतील फुटीनंतर आता स्वत:ची ताकद मराठवाड्यात वाढविली पाहिजे या भूमिकेतूनच चव्हाणांना भाजपनं बरोबर घेतलं आहे.

Sharad Pawar | Devendra Fadnavis
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंना मोठं चॅलेंज; 'राजीनामा द्या अन्...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com